राहुरी | नगर सह्याद्री
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी राहुरीत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहर बंदचे आयोजन करण्यात आले आहे.
यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, जंतरमंतर, नवीदिल्ली येथे पेपर फुटी परीक्षा प्रक्रियेतील विद्याथ शांततापूर्ण आंदोलन करीत आहेत. याआंदोलनास सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण करून पाठींबा दिला आहे. आंदोलनकर्त्यांना पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आले. अनेक विद्याथ जखमी झाले या संपूर्ण घटनेची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करुन हे कृत्य करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांच्या समर्थन व पाठींबा देण्यासाठी दि.24 रोजी राहुरी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, जिल्हा संपर्कप्रमुख पिंटुनाना साळवे, अमजद पठाण, शिरीष गायकवाड, नागेश जाधव, ऋषिकेश साळवे, गणेश पवार, विवेक साळवे आदींचा सह्या आहे.










