- जाहिरात -spot_img
breaking news

मुख्यमंत्र्यांची विधानभवनात चक्क बुलेटवरून एन्ट्री, गडकरी बसने, तर प्रताप जाधव मेट्रोने प्रवास…

पंतप्रधान मोदींचे आवाहन अन् मुख्यमंत्री फडणवीसांची थेट कृती; देवेंद्र फडणवीस यांची बुलेट स्वारी
मुंबई | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी विधानभवनात चक्क बुलेटवरून एन्ट्री केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांनी आपला ताफ्यातील वाहनांना घेऊन न जाता बुलेटवरून जाण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री आणि आशिष शेलार दुचाकीवरून मंत्रालयात दाखल झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः बुलेट चालवत विधानभवन गाठले. त्यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार हे देखील पाठीमागे बसलेले पाहायला मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला पोलिसांचा ताफा आणि सुरक्षा रक्षकही गाड्यांऐवजी बाईकवरूनच विधानभवन परिसरात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आणि जनतेला इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे पाऊल उचलले होते.

फडणवीस यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळेही दुचाकीवरुन मंत्रालयात दाखल झाले. मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत फडणवीसांच्या या बाईक एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मंत्री, अधिकार्‍यांचे परदेश दौरे रद्द
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील सध्याची कठीण आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहनही केले आहे. त्यानुसार फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत सर्व मंत्री आणि अधिकार्‍यांचे अभ्यास, कामासाठीचे परदेश दौरे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

नितीन गडकरी यांचा बसने, तर प्रताप जाधव यांचा मेट्रोने प्रवास
फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. पालखी महामार्गाची पाहणी स्वत: गडकरी बसने प्रवास करत करणार आहेत. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनीही मेट्रोने प्रवास केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांनी इव्ही कारने प्रवास केला. त्यामुळे नेतेमंडळींकडून मोदींच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा :  पाच लाखांच्या खंडणीची मागणी; बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ