- जाहिरात -spot_img
breaking news

उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी सकल मातंग समाजाचा महामोर्चा, या आहेत मागण्या…

अनुसूचित जातींच्या आरक्षणातील लाभ वंचित घटकांना देण्याची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवगकरण तातडीने लागू करून लाभवंचित घटकांना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारांना असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयामुळे सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, निर्णयानंतरही महाराष्ट्र शासनाने अद्याप उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न केल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी आहे.

मातंग समाजाला नोकरी, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांमध्ये अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालेले नसल्याने सन 1980 पासून उपवगकरणाची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. सन 2022 पासून विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि समाजातील मान्यवरांनी एकत्र येत सकल मातंग समाज महाराष्ट्रच्या माध्यमातून हा लढा अधिक व्यापक केला आहे. या आंदोलनांतर्गत ‌‘जवाब दो आंदोलन‌’, दवंडी आंदोलन आणि जनआक्रोश महाआंदोलन यांसारखे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी निवृत्त न्यायमूत अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना केली होती. समितीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून, विविध राज्यांमधील उपवगकरणाच्या प्रक्रियेचा आढावा घेत आवश्यक माहिती व तथ्यांचे संकलन केले. त्यानंतर मार्च 2026 मध्ये समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला.

यानंतर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत विविध समाजघटकांकडून सूचना व हरकती मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासनाकडून अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, अशी खंत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी शासनाने चालू पावसाळी अधिवेशनात अनुसूचित जातींच्या उपवगकरणाचा निर्णय घेऊन तो तात्काळ लागू करावा, लाभवंचित समाजघटकांना अतिरिक्त मागासलेपणाचा लाभ द्यावा तसेच आरक्षणातील अनुशेष (बॅकलॉग) भरून काढावा, अशी मागणी करण्यात आली.
शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चा व निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  निघोज शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप...संपादक शिवाजी शिर्के यांचा वाढदिवस
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ