- जाहिरात -spot_img
breaking news

विखे परिवारामुळे पारनेरच्या विकासाची गती कायम ः राहुल शिंदे

नामदार चषक स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
राळेगण थेरपाळ | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विखे परिवाराने नेहमीच झुकते माप दिले. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, क्रीडा व इतर विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. विखे परिवारामुळे पारनेरच्या विकासाची गती कायम असल्याचे प्रतिपादन भाजपा मंडळाध्यक्ष राहुल शिंदे यांनी केले.
राळेगण थेरपाळ (ता.पारनेर) येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‌‘नामदार चषक 2026‌’ क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती मधुकर उचाळे यांच्याहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन मिळत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन वराळ, माजी सरपंच दत्तानाना पवार, ज्येष्ठ मार्गदर्शक भास्करराव वराळ, भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज कारखिले, उद्योजक रगणेश बोंबले, भाजपचे जिल्हा चिटणीस अतुल माने, माजी चेअरमन बाळासाहेब पुंडे, सरपंच संतोष काटे, विकास पवार, रावसाहेब वराळ, बन्सी बढे, राजेश गोपाळे, शरद गोपाळे, पांडुरंग बढे, भाऊसाहेब बढे उपस्थित होते.स्पर्धेसाठी परिसरातील संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून युवकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ
युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, याउद्देशाने नामदार चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून अशा उपक्रमांना सातत्याने बळ मिळत असून, भविष्यातही सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबविण्यात येतील
                       सचिन वराळ, पंकज कारखिले, आयोजक

हे सुद्धा वाचा :  २०४७ मध्ये अखंड भारत निर्माण होईल ः विवेक कुलकर्णी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ