- जाहिरात -spot_img
breaking news

पत्नीच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टरची अनोखी भेट; कोतकर कुटुंबाचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण

शहरातील देवस्थानांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वाढदिवस म्हटला की फुले, दागिने, गाड्या किंवा इतर महागड्या भेटवस्तू देण्याची परंपरा सर्वत्र दिसते. मात्र, केडगावच्या कोतकर कुटुंबाने या परंपरेलाच एक वेगळे रूप दिले. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी आपल्या पत्नी व जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त खासगी हेलिकॉप्टर भेट देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ही केवळ वाढदिवसाची भेट नव्हती, तर कोतकर कुटुंबाच्या अनेक वर्षांच्या स्वप्नपूतचा भावनिक क्षण होता. व्यवसायाच्या बळावर यशाची अनेक शिखरे सर केलेल्या या कुटुंबाने आपल्या कष्टांचे आणि जिद्दीचे आणखी एक स्वप्न साकार केले.
अहिल्यानगर शहरात राजकीय व हॉटेल व्यवसायात नावलौकिक असलेल्या कोतकर परिवाराने हेलिकॉप्टरची खरेदी केल्याने नगर शहरातच नाही तर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. त्यांचा हॉटेल संदीपचा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे तीनही पुत्र हॉटेल व्यवसाय सांभाळतात. अहिल्यानगरचे माजी महापौर संदीप कोतकर अनेक वर्षांपासून  पुण्यात हॉटेल व्यवसायात आघाडीवर आहेत.

गेल्यावर्षी कोतकर कुटुंबाने स्वतःचे हेलिकॉप्टर घेतले होते. त्यानंतर पुन्हा वर्षभराने दुसरे हेलिकॉप्टर केडगावात दाखल होताच ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर आणि जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर यांनी विधीवत पूजन करून स्वागत केले. त्यानंतर हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेत केडगावच्या रेणुका माता मंदिरावर, शहराचे आराध्य दैवत श्री विशाल गणपती मंदिरावर तसेच माळीवाड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. आकाशातून बरसणारी फुले पाहताना अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि कौतुकाचे भाव उमटले.शहरावर हेलिकॉप्टरच्या घिरक्या पाहून अनेक नागरिकांनी कुतुहल वाटले. जो तो आकाशाकडे पाहत होता.

कोतकर कुटुंबाचा प्रवास संघर्षातून यशाकडे झालेला आहे. संदीप उद्योग समूहाच्या माध्यमातून हॉटेल व्यवसायात महाराष्ट्रभर नाव कमावलेल्या या कुटुंबाने आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठी ओळख निर्माण केली. आज त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा त्यांनी गाठला आहे.

हे सुद्धा वाचा :  सेनापती बापट पतसंस्थेच्या संचालकांविरोधात पारनेरमध्ये संतापाचा उद्रेक!; माजी आमदार विजय औटींच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी

पत्नीच्या वाढदिवसाचेनिमित्त, कुटुंबाच्या स्वप्नपूतचा आनंद आणि देवस्थानांवर करण्यात आलेली पुष्पवृष्टी यामुळे दि. 3 जून हा दिवस कोतकर कुटुंबासाठी कायमचा संस्मरणीय ठरला. कोतकर कुटुंंबियांच्या अलिशान गाड्यांच्या ताफ्यात पुन्हा एका हेलिकॉप्टरची भर पडली आहे.

आमच्यासाठी हा भावनिक क्षण : सचिन कोतकर
स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर असावे, हे आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे स्वप्न होते. आज ते प्रत्यक्षात उतरले असून हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आणि भावनिक क्षण आहे, अशी भावना उद्योजक सचिन कोतकर यांनी व्यक्त केली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ