मेष : कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि निर्णय क्षमता कौतुकास्पद ठरेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल
वृषभ : आरोग्याबाबत गाफील राहू नका, पोटाच्या तक्रारी उद्भवू शकतात. वैयक्तिक आयुष्यात आनंद राहील.
मिथुन : भागीदारीतील कामात आणि आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. तब्येतीची थोडी काळजी घ्या. दिवस सामान्य जाईल.
कर्क : . वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील.
सिंह : कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा, खर्च वाढू शकतो.
कन्या : जुनी एखादी समस्या पुन्हा डोके वर काढू शकते. मात्र, नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
तूळ : तरुणांना नोकरीच्या मुलाखतींमध्ये यश मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये अहंकार बाजूला ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.
वृश्चिक : गुंतवणुकीच्या आणि नातेसंबंधांच्या बाबतीत काळ सकारात्मक आहे. भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका.
धनु : नियोजित कामांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका..
मकर : कामाच्या ठिकाणी काही ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, संयम ठेवा. धन आणि आरोग्याची स्थिती चांगली राहील.
कुंभ : ऑफिसमध्ये अतिरिक्त काम करावे लागेल. जोडीदारासोबत वैयक्तिक जागेवरून वाद होऊ शकतात.
मीन : कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने समोर येतील, ज्यांचा यशस्वीपणे सामना कराल.










