- जाहिरात -spot_img
breaking news

बेकायदा गर्भलिंग तपासणी प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी केली मोहीम फत्ते…

श्रीरामपूर | नगर सह्याद्री
लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्मळपिंपरी परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदानाच्या गंभीर आणि समाजघातक रॅकेटवर पोलिसांनी मोठा घाव घालत, श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठीत डॉटर रवींद्र कुटेसह दोन एजंटांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपूर आणि लोणी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत या प्रकरणाचा विस्तार उघडकीस आला आहे.

श्रीरामपूर शहरातील डॉ. रवींद्र कुटे सह प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा.कोर्हाळे), निलेश ज्ञानेश्वर भवर (नपावाडी) असे याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दि. २९ एप्रिल २०२६ रोजी अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. राहाता तालुयातील पिंपरी निर्मळ शिवारातील निळवंडे कालव्यालगत असलेल्या एका खोलीत गर्भवती महिलांकडून तब्बल १० हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात असल्याचे समोर आले होते.

या माहितीची खातरजमा करत पोलीस पथकाने वैद्यकीय अधिकार्‍यांसह आणि पीसीपीएनडीटी प्राधिकरणाच्या उपस्थितीत सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात डॉ. राहुल भणगे, रा. भानसहिवरे, ता. नेवासा आणि अभिजीत भुसाळ यांना रंगेहात पकडण्यात आले. घटनास्थळावरून अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, विविध साहित्य आणि तीन चारचाकी वाहने असा तब्बल २४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दरम्यान, तपासाच्या पुढील टप्प्यात तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणारे प्रदीप भाऊसाहेब ढगे (रा. कोर्हाळे) आणि निलेश ज्ञानेश्वर भवर (वय ४२, नापावाडी) यांचा सहभाग उघड झाला. पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली. विशेष म्हणजे, आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचाही या गैरप्रकारात सहभाग असल्याचे समोर आले असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा :  भंडारदऱ्यात पावसाचे तांडव! वाकी ओव्हर फ्लो; पर्यटनासाठी भंडारदरा बंद, महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ