- जाहिरात -spot_img
breaking news

अहिल्यानगरकर ‘गॅस’वर; रिक्षाचालकांंचे प्रचंड हाल…

घरगुती सिलेंडरसाठी एजन्सी तर एलपीजी गॅससाठी रिक्षांच्या रांंगा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

आखाती देशातील युद्धाची झळ नागरिकांसह हॉटेल, रिक्षाचालकांना बसू लागली आहे. गॅस सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी गॅसएजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. दुसरीकडे एलपीजी गॅससाठी सक्कर चौकातील पंपाबाहेर गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहनांची एक किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचे चित्र दिवसभर दिसत आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या टंचाईमुळे आता हॉटेलध्ये चूली पेटू लागल्या असून, हॉटेल, घरगुती खानावळ, उद्योगांवर याचे परिणाम होऊ लागले आहे.

आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्याचा मोठा फटका घरगुती गॅस सिलेंडरला बसला आहे. आगामी काळात सिलिंडरची टंचाई निर्माण होईल, या भितीपोटी नागरिक सिलिंडर पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करत आहे. घरगुती सिलिंडरचा तुटवडा नाही, असे जिल्हा प्रशासन सांगत असताना दुसरीकडे बुकिंग होत नाही अन् झाले तर सिलिंडर उपलब्ध होत नाही. प्रशासनाने तक्रारीसाठी जाहीर केलेले नंबर लागत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केल्यानंतर आता ३० दिवसांनी सिलिंडर मिळणार आहे. यापूर्वी २१ दिवसांनी सिलिंडर मिळत होता. याचा फटका कुटुंबांना बसत आहे. सिलिंडर पदरात पाडून घेण्यासाठी गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. तासनतास उन्हात उभे राहून वाट पाहावी लागत असल्याने नगरकर घामाघूम झाले आहे. वाढत्या गर्दीमुळे काही ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेलचालक व इतर व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडर चढ्या भावाने खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. काळ्या बाजारात घरगुती सिलिंडरचे दर दुप्पट झाले आहे.

एलपीजी गॅस असलेल्या रिक्षाचालकांना दिवसभर पंपाबाहेर उभे राहण्याची वेळ आली आहे. या गॅसचा तुटवडा झाल्यामुळे पंपाच्या दोन्ही बाजूने लांबलचक रांगा लागल्या आहे. रिक्षात गॅस भरण्यासाठी शहरात दोनच पंप असून, गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना पंपाबाहेर तासनतास उभे राहण्याची वेळ आली आहे. सक्कर चौकातील पंपाबाहेर दोन्ही बाजूंनी रिक्षाचालकांच्या रांगा लागल्या आहेत. एलपीजी गॅसचे दर दुप्पट झाले असून, ५० रुपये लीटर असलेेला गॅस आता ८५ ते ९० रुपये लीटर झाल्याने रिक्षाचालकांच्या खिशाला झळ बसली आहे.

हे सुद्धा वाचा :  महिला वकिलावर जीवघेणा हल्ला; बनावट पोर्टल तयार करून फसवणूक; महिलेच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या, कुठे काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ