- जाहिरात -spot_img
breaking news

सभापती, उपसभापती उद्या पदभार घेणार; खासदार डॉ. नीलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती

पारनेर | नगर सह्याद्री

कृषि उत्पन्न बाजार समिती, पारनेरच्या सभापतीपदी गंगाराम बेलकर आणि उपसभापतीपदी संदिप सालके यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर, त्यांचा अधिकृत पदग्रहण समारंभ मंगळवार, दि. १४ एप्रिल रोजी पार पडणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला असून, खासदार डॉ. नीलेश लंके यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल.

सकाळी नऊ वाजता पारनेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर बाजार समितीच्या कार्यालयात नूतन पदाधिकारी आपला पदभार स्वीकारतील. या प्रसंगी मावळते सभापती किसनराव रासकर, उपसभापती किसनराव सुपेकर, सर्व संचालक मंडळ, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला तालुयातील नागरिकांनी व शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  बदलत्या पावसाच्या पॅटर्नने बळीराजाची धाकधूक वाढली!; खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ