- जाहिरात -spot_img
breaking news

मान्सून लांबणीवर…; महाराष्ट्रात केव्हा दाखल होणार? नवा अंदाज?

मुंबई | नगर सह्याद्री
भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, मान्सूनच्या प्रवासाबाबत समोर आलेल्या ताज्या अपडेटमुळे चिंता वाढली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने, या वार्‍यांमुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. अंदमानमध्ये १८ मे पर्यंत मान्सून येईल, असा अंदाज होता; पण कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याला उशीर झाला. महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यातमान्सून दाखल होऊ शकतो अशी माहिती आहे.

मे महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत राज्यातील अनेक भागांत अधूनमधून झालेल्या पावसामुळे विदर्भ वगळता इतर शहरांचा पारा फारसा वाढला नाही. आता १५ मे पासून वायव्य दिशेकडून येणार्‍या जोरदार पश्चिमी वार्‍यांच्या प्रभावामुळे राज्यात पुढील ४ दिवस पावसाची शयता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटे तसेच बंगालच्या उपसागराचा काही भाग ओलांडला आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, यावेळी मान्सून लवकर दाखल होणार असला, तरी त्याची सुरुवात फारशी जोरदार नसेल.
केरळमध्ये यंदा सुरुवातीला कमकुवत मान्सूनचा सामना करावा लागू शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सून हंगामात सरासरीच्या ९२% पेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे. जून महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, जे मान्सूनच्या कमकुवत सुरुवातीचे संकेत आहेत. त्यामुळे हवामान तज्ज्ञांनी दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही परिस्थितींसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे.

साधारणपणे १ जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये दाखल होतो, पण यंदा तो थोडा लवकर म्हणजेच २६ मे २०२६ पर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शयता आहे. गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) केरळमध्ये मान्सून २४ मे रोजीच दाखल झाला होता. यंदा २६ मे रोजी केरळमध्ये आगमन झाल्यानंतर त्याचा देशभरातील प्रवास सुरू होईल.

१० जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
केरळमध्ये २६ मेच्या सुमारास मान्सून दाखल झाल्यानंतर, पुढील २ ते ४ दिवसांत तो तळकोकणात प्रवेश करेल. त्यानंतरच्या २ दिवसांत मान्सून मुंबईत धडकेल आणि १० जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज आहे. दरवर्षीपेक्षा मान्सून यंदा लवकर येत असला, तरी त्याच्या मार्गात वारंवार अडथळे येण्याची शयता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा :  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन

मान्सूनचा प्रवास रेंगाळणार!
यंदा मान्सून केरळमध्ये लवकर पोहोचणार असला, तरी संपूर्ण देश व्यापायला त्याला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. साधारणपणे मान्सूनला संपूर्ण भारत व्यापण्यासाठी ३५ ते ३८ दिवस लागतात, पण या वेळी हा प्रवास रेंगाळण्याची शयता आहे. मस्कायमेटफचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार, या वर्षीच्या मान्सूनला २००२ च्या मान्सूनसारखाच धोका आहे. २००२ मध्ये मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता, तरीही संपूर्ण देश व्यापायला त्याला तब्बल ७९ दिवस लागले होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ