- जाहिरात -spot_img
breaking news

‌‘तुकाई उपसा सिंचन योजना नियोजित वेळेत पूर्ण करा‌’

कर्जत | नगर सह्याद्री
कर्जत तालुक्यासाठी जीवनदायिनी ठरणारी महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी तुकाई उपसा सिंचन योजना विहित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

कर्जत तालुक्यातील या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्राच्या पाहणीप्रसंगी त्यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक क्षेत्राचे मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी प्रकल्पातील पूर्ण झालेल्या कामांची तसेच प्रगतीपथावरील कामांची सविस्तर माहिती सचिवांना दिली.या योजनेत यांत्रिकी, विद्युत व स्थापत्य विभागांच्या समन्वयातून कार्यक्षेत्रावर काम सुरू आहे. हा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने तो विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सचिव जितेंद्र पापळकर व मुख्य अभियंता हरिभाऊ गीते यांनी प्रकल्पाशी संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले.

प्रकल्पाचे काम गतीने सुरू असून तो नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांनी दिली. या क्षेत्रीय पाहणी दौऱ्यावेळी जलसंधारण विभागाचे उपअभियंता प्रवीण दहातोडे, उपकार्यकारी अभियंता सचिन भालेराव, वरिष्ठ अभियंता योगेश आंबिलवादे, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता धनंजय दाहिदार, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गुळूमकर तसेच उपअभियंता अजिंक्य थोरात उपस्थित होते.

 

हे सुद्धा वाचा :  संगमनेर मर्चंट बँकेची एक हजार कोटींची उद्दिष्टपूर्ती हा ऐतिहासिक क्षण : राजेश मालपाणी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ