- जाहिरात -spot_img
breaking news

शहराच्या विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर, कोणती कामे होणार पहा

आमदार संग्राम जगताप यांची माहिती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सहकार्याने नगर शहर व केडगाव मधील रस्त्यांच्या व पुलाच्या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

अधिक माहिती देताना आ.जगताप म्हणाले, राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शहरातील विकासकामांसाठी सातत्याने निधी मंजूर होत आहे. नव्याने मंजूर झालेल्या २५ कोटी रुपयांच्या निधी मधून केडगाव वेश ते देवी मंदिर ते रेल्वे अंडर पास रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामासाठी ७ कोटींचा निधी, तसेच भूषणनगर लिंक रोड वरील डागवाले फार्म जवळील पुलाच्या रुंदीकरण व सुशोभीकरण कामासाठी ३ कोटींचा निधी, तसेच नगर शहरातील पुना रोडवरील उड्डाणपुलाखालील कोठी चौक ते एसबीआय चौक पावन हनुमान मंदिर पर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी १५ कोटी रुपये निधी असा एकूण २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

राज्यातील महायुती सरकारच्या सहकार्याने नगर शहरात मोठ्या वेगाने विकासकामे होत आहेत. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न मार्गी लागत आहेत, असेही आमदार संग्राम जगताप यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा :  प्रलंबित मोजणी प्रकरणे तातडीने मार्गी लावा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ