- जाहिरात -spot_img
breaking news

पारनेरच्या ३५ गावांना मिळणार दिलासा; आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश

टाकळी ढोकेश्वर स्वतंत्र पोलीस ठाण्यास मंजुरी
पारनेर | नगर सह्याद्री

पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तालुयातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण करण्यास शासनाने अंतिम मंजुरी दिली असून, याबाबतची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला हे मोठे यश मानले जात आहे.

पारनेर तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून, दिवसेंदिवस लोकसंख्या आणि औद्योगिकीकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत, संपूर्ण तालुयाचा भार केवळ पारनेर पोलीस ठाण्यावर पडत होता. अंतरामुळे दुर्गम भागातील नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी पारनेरपर्यंत लांबचा प्रवास करावा लागत असे. ही अडचण लक्षात घेऊन आमदार काशिनाथ दाते यांनी गेल्या वर्षी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत गृह विभागाने या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले आहे.

तालुयात यापूर्वीच सुपा पोलीस ठाणे स्वतंत्रपणे कार्यरत आहे. आता टाकळी ढोकेश्वरच्या मंजुरीमुळे तालुयातील एकूण १०१ गावांना दोन ते तीन विभागांतून संरक्षण मिळणार आहे. आमदार दाते यांच्या या विकासकामांमुळे तालुयाच्या पश्चिम भागात समाधानाचे वातावरण असून, स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पारनेर पोलीस ठाण्यावरील ताण होणार कमी
टाकळी ढोकेश्वर स्वतंत्र झाल्यामुळे आता मूळ पारनेर पोलीस ठाण्यांतर्गत ६६ गावे उरणार आहेत. यामध्ये पारनेर शहर, राळेगण सिद्धी, निघोज, जवळा, भाळवणी आणि पळशी यांसारख्या मोठ्या गावांचा समावेश आहे. कामाच्या विभागणीमुळे पोलिसांवरील कामाचा ताण कमी होऊन, तपासाच्या कामात अधिक गती आणि अचूकता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तालुयाचे सुरक्षेचे कवच मजबूत
टाकळी ढोकेश्वर हे तालुक्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे पोलीस ठाणे झाल्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे सोपे होईल. सामान्य माणसाला वेळेवर न्याय मिळेल, हाच आमचा प्रामाणिक उद्देश होता.             – काशिनाथ दाते, आमदार

हे सुद्धा वाचा :  शिंगोरीचा हर्षद चेमटे ठरला एशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णविजेता

३५ गावांचा समावेश
नव्याने अस्तित्वात येणार्‍या टाकळी ढोकेश्वर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ३५ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये टाकळी ढोकेश्वर, सावरगाव, ढोकी, नांदुर पठार, कर्जुले हर्या, वनकुटे, पळसपूर, कासारे, खडकवाडी, म्हसोबाझाप, देसवडे, धोत्रे (बु. व खु.), ढवळपुरी, पळशी, काकणेवाडी, पोखरी, हिवरे कोरडा, पिंपळगाव रोठा, माळकुप, अक्कलवाडी, तिखोल, भनगडेवाडी आणि अन्य गावांचा समावेश आहे.या निर्णयामुळे या गावातील नागरिकांना पोलीस सेवा आता अगदी घराशेजारी उपलब्ध होणार आहे. गुन्हे प्रतिबंध करणे आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे प्रशासनाला आता अधिक सुलभ होणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ