कर्क : इतरांचे सहकार्य लाभेल आणि महत्त्वाचे पत्रव्यवहार किंवा कागदपत्रांचे काम मार्गी लागेल.
मेष: आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील.
वृषभ: आज कामाच्या ठिकाणी स्पष्ट योजना आखून पुढे जाणे फायदेशीर ठरेल.
मिथुन : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल, संयम राखणे गरजेचे आहे.
कर्क : इतरांचे सहकार्य लाभेल आणि महत्त्वाचे पत्रव्यवहार किंवा कागदपत्रांचे काम मार्गी लागेल.
सिंह : स्वयंरोजगार किंवा व्यवसायातून चांगला नफा मिळेल. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या : वाहन चालवताना काळजी घ्या. आरोग्याशी संबंधित गोष्टींवर खर्च होण्याची शक्यता आहे.
तुळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाच्या गाठीभेटी यशस्वी होतील. भावनेच्या आहारी जाऊन खर्च करणे टाळा
वृश्चिक : दैनंदिन कामे सहज पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल.
धनु : नोकरीत परिस्थिती समाधानकारक राहील. जुन्या अनुभवातून योग्य धडा घ्याल.
मकर : पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता.
कुंभ : कार्यक्षेत्रात नवीन संधी आणि प्रसिद्धी लाभेल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी दूर होतील.
मीन : कामात जिद्द आणि चिकाटी दिसून येईल. विरोधकांवर मात कराल.










