- जाहिरात -spot_img
breaking news

फ्लेक्स, टपऱ्या, हातगाड्या हटवल्या; मनपाची सावेडी उपनगर व शहरात कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

महापालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सावेडी उपनगरात मॅक केअर हॉस्पिटल परिसर, झोपडी कॅन्टींग व आयुर्वेद कॉर्नर ते रिमांड होम परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. पोलवरील अवैध फ्लेक्स बोर्ड व रस्त्याच्या कडे ला असलेल्या चहाच्या टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या आदेशानुसार सावेडी प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गत गुरुवारी (2 जुलै) व्यापक अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत झोपडी कॅन्टीन (मॅक्स केअर हॉस्पिटल) ते टीव्ही सेंटर, प्रोफेसर चौक, सोना नगर चौक आणि भिस्तबाग चौक या मार्गावरील लाईटच्या खांबांवर लावण्यात आलेले अनधिकृत फलक, स्टँडिंग बोर्ड, झेंडे तसेच रस्त्यावरील अडथळे हटविण्यात आले.

याशिवाय रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या काही भाजी विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच आयुर्वेद कॉर्नर ते रिमांड होम परिसरातील रस्ता अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला. ही कारवाई महापालिकेचे आयुक्त यांच्या आदेशानुसार अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी प्रभाग समिती क्रमांक 1 चे क्षेत्रीय अधिकारी तसेच अतिक्रमण विभागाच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केली.

हे सुद्धा वाचा :  शाळेची घंटा वाजली: शाळांमध्ये काय काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ