- जाहिरात -spot_img
breaking news

दिंडीला निधी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या!; वारकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

ह.भ.प. बाबा महाराज झेंडे | 
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पंढरपूर वारीसाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानावर आता वारकरी संप्रदायातूनच आक्षेप घेण्यात आला आहे. राज्य शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. बाबा महाराज झेंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना पत्र पाठवत दिंडी सोहळ्यासाठी शासकीय निधी देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. दिंडीसाठी दिला जाणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा असे त्यांनी म्हटले आहे.

वारकरी स्वतःच्या खर्चाने आणि श्रद्धेने वारी करतो. आम्ही सरकारकडे कोणत्याही निधीची मागणी करत नाही. दिंडीसाठी दिला जाणारा सरकारी निधी थांबवून तो राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरावा, अशी ठाम भूमिका बाबा महाराज झेंडे यांनी मांडली.मागील वष अनेक दिंड्यांना शासकीय अनुदानाचा लाभ मिळालाच नसल्याचा आरोप करत, ठराविक लोकच या निधीवर डल्ला मारत आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.राज्य सरकारचा पैसा चुकीच्या मार्गाने खर्च करण्यापेक्षा तो संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी वापरण्यात यावा, अशी मागणी आनंदाश्रम स्वामी दिंडी सोहळ्याच्या वतीने करण्यात आली आहे.वारकरी संप्रदायातून आलेल्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  नेहरू मार्केटचा इतिहास टिकवून ठेवा; पालकमंत्री नेमकं काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ