- जाहिरात -spot_img
breaking news

सभापती प्रा. राम शिंदे विठुराया चरणी ; अन्नदात्याला सुखी ठेवण्याची केली प्रार्थना

पंढरपूर | नगर सह्याद्री
जगाचा अन्नदाता शेतकऱ्याला सुखी ठेवण्याची प्रार्थना श्रीविठ्ठल चरणी केल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. श्रीविठ्ठल व रुक्मिणी माता यांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले व महाराष्ट्र विकासात अग्रेसर असलेल्या महायुतीच्या सरकारमध्ये योगदान देण्याचा उत्साह अधिक वृद्धींगत झाला, अशी भावनाही प्रा. शिंदे यांनी व्यक्त केली.

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी (21 जुलै) सकाळी आठच्या सुमारास पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती केली गेली. पांडुरंगाच्या पुजाऱ्यांद्वारे त्यांच्या गळ्यात तुळशी हार घालण्यात आला. यावेळी पांडुरंग चरणी नतमस्तक होत दर्शन त्यांनी घेतले व नंतर रुक्मिणी माता मंदिरातही जाऊन तेथे पूजा केली. त्यानंतर मंदिर समितीच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रा. शिंदे म्हणाले, हेची दान देगा देवा, तझा विसर न व्हावा…या भावनेने पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची पांडुरंग भेटीची ओढ पाहून प्रत्येकाच्या मनात भक्तीभाव जागृत होतो. पांडुरंग दर्शनासाठी जाताना दर्शन बारीत असलेल्या वारकरी भक्तांना आवर्जून भेटलो. त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेताना त्यांच्या मनातील भक्तीभाव जाणवला. अनेक अडचणींवर मात करीत पायी वारी करून पंढरपुरात पोहोचलेल्या वारकऱ्यांना भेटताना व जय हरी…जय माऊली..म्हणत त्यांच्याशी संवाद साधताना मनस्वी आनंद झाला.

या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना सुखी ठेव, चांगले आरोग्य दे व चांगला पाऊस राज्यभर होऊ दे, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी प्रार्थना श्रीविठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चरणी केली, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान, सभापती प्रा. शिंदे मंगळवारी (21 जुलै) पंढरपूर मुक्कामी होते. तेथे त्यांची विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.

हे सुद्धा वाचा :  कानिनाथ यात्रेसाठी मढीत जय्यत तयारी; रोषणाईने उजळले चैतन्य कानिफनाथ मंदिर
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ