- जाहिरात -spot_img
breaking news

बंगल्याचे कुलूप तोडून थकबाकीदाराचे पुन्हा अतिक्रमण, जर्सी गायींची चोरी, मायलेकीवर हल्ला…

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
न्यायालयाच्या आदेशाने बँकेने कायदेशीर ताबा घेतलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे प्रवेश करून अतिक्रमण केल्याचा प्रकार केडगाव परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एचडीएफसी बँकेचे वसुली व्यवस्थापक स्वप्नील सतिषराव वैद्य यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संदिप दत्तात्रय नांगल आणि भाग्यश्री संदिप नांगल (दोघेही रा. भूषणनगर, केडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संदिप नांगल यांनी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सदर मिळकत बँकेच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भूषणनगर येथील प्लॉट क्रमांक २६/२७/५ वर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी कोर्ट कमिशनर आणि पोलीस बंदोबस्तात बँकेने कायदेशीर ताबा मिळवला होता. मालमत्तेला अधिकृत सील लावून बँक प्रशासनाने तेथे सूचना फलकही लावले होते.

​मात्र, ६ एप्रिल रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपींनी बँकेची कोणतीही परवानगी न घेता आणि न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून या मिळकतीत बेकायदा प्रवेश केला. जप्त केलेल्या मालमत्तेचे कुलूप तोडून तिथे पुन्हा अतिक्रमण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या धाडसी कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर घुसखोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे आता थकबाकीदार नांगल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग; आलमगीर परिसरातील तरुणावर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील आलमगीर परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शिक्षण घेत असून आरोपी अथर्व धाडगे (रा. सावतानगर, आलमगीर) हा गेल्या दोन महिन्यांपासून तिला त्रास देत होता. १४ फेब्रुवारी ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत पीडिता जेव्हा माधवबाग ते मार्केटयार्ड परिसरातून ये-जा करत असे, तेव्हा आरोपी तिचा चोरून पाठलाग करत होता. मुलीशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने त्याने वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा :  गुन्हे शाखेच्या पथकावर दगडफेक; सहा पोलीस जखमी, वाहनाचे नुकसान

​मात्र, आरोपीच्या या वर्तनामुळे पीडितेच्या मनात भीती निर्माण झाली होती. आरोपीने पीडितेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने अखेर पीडितेने कुटुंबियांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून भिंगार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर हे करत असून आरोपीचा शोध सुरू आहे. शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पिंपळे वस्तीतून चार जर्सी गायींची चोरी; रोहित चोरमले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील संभाजीनगर रोडवरील पिंपळे वस्ती परिसरातून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपये किमतीच्या चार जर्सी गायी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पिंपळे वस्ती येथील चेतना हॉटेल शेजारी राहणारे रोहित गोरख चोरमले यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. रोहित चोरमले यांचा दुग्धव्यवसाय असून त्यांनी आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत जर्सी गायी बांधल्या होत्या. २ मार्च रोजी रात्री ११ ते ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्याने रोहित चोरमले यांच्या मालकीच्या ५० हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरल्या. तसेच, त्यांच्या शेजारी राहणारे रोहित विजय वर्मा यांची एक आणि तुषार रवी करोलिया यांची एक अशा एकूण चार जर्सी गायी चोरट्याने लांबवल्या.

​चोरून नेलेल्या या चारही गायींची एकूण किंमत दोन लाख रुपये इतकी आहे. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. रोहित चोरमले यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक जे. सी. भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार प्रियंका राऊत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा :  जुने दहिफळ येथे जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा...कोणाला केली अटक

कौटुंबिक वादातून मायलेकीवर लोखंडी रॉडने हल्ला; अहिल्यानगरमधील केडगाव परिसरातील घटना
​अहिल्यानगर: शहरानजीकच्या केडगाव परिसरात घरगुती वादातून एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह पोटच्या मुलीवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी हा नेहमी दारू पिऊन घरात वाद घालत असे. घटनेच्या दिवशी देखील त्याने मद्यधुंद अवस्थेत कुटुंबाला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून पीडितेने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने रागाच्या भरात घरातील लोखंडी रॉडने फिर्यादी आणि त्यांच्या मुलीवर वार केले. या हल्ल्यात दोघींच्याही हात, पाय आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.

​घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी करत आहेत. कौटुंबिक हिंसेच्या या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ