- जाहिरात -spot_img
breaking news

मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्थेला मिळाले नवे कारभारी, कोणाची झाली निवड पहा…

चेअरमनपदी बाबासाहेब मुदगल; व्हाईस चेअरमनपदी कैलास चावरे यांची बिनविरोध निवड / संचालक मंडळाचा एकमताने निर्णय; सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्याचा नूतन पदाधिकाऱ्यांचा निर्धार
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी बाबासाहेब मुदगल तर व्हाईस चेअरमन पदी कैलास चावरे यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी ज्योतीताई हराळे यांनी पाहिले.
चेअरमन पदासाठी बाबासाहेब मुदगल यांच्या नावाची सूचना संचालक सोमनाथ सोनवणे यांनी मांडली तर अनुमोदन संचालिका प्रमिलाताई पवार यांनी दिले. त्याचप्रमाणे व्हाईस चेअरमन पदासाठी कैलास चावरे यांच्या नावाची सूचना संचालक बलराज गायकवाड यांनी केली तर अनुमोदन संचालक अजय कांबळे यांनी दिले.

या प्रसंगी तज्ञ संचालक जितेंद्र सारसर, माजी चेअरमन विजय कोतकर, माजी व्हॉइस चेअरमन किशोर कानडे, संचालक सतीश ताठे, विकास गीते, गुलाब गाडे, शेखर देशपांडे, बाळासाहेब गंगेकर, बाळासाहेब पवार, कार्यलक्ष्मी संचालक आनंद तिवारी आदींसह कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नूतन चेअरमन बाबासाहेब मुदगल म्हणाले की, अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी माझी बिनविरोध निवड झाली असून संचालक मंडळांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याला न्याय देत सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.

ते पुढे म्हणाले की, यावर्षी पतसंस्थेला सुमारे २ कोटी ११ लाख ८७ हजार ८१२ रुपयांचा नफा झाला असून वसूल भाग भांडवल ५ कोटी ५९ लाख ४१ हजार ३८० रुपये आहे. सभासद ठेव सुमारे २४ कोटी १४ लाख ६८ हजार ८६८ रुपये असून एकूण कर्जवाटप २८ कोटी ५४ लाख २२ हजार ६२० रुपये आहे.

तसेच, यावर्षीपासून परीविक्षाधीन सभासदांना सुमारे १ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. सभासदांना आरोग्य तपासणीसाठी तातडीची आर्थिक मदत, तसेच त्यांच्या पाल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक व विवाहासाठी कर्जरूपी मदत दिली जाते. पतसंस्थेच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही सकारात्मक काम करू, असेही त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  सोयाबीनचे विक्रमी उत्पादन...कोणत्या भागातील घटना

नूतन व्हाईस चेअरमन कैलास चावरे यांनी संचालक मंडळ व सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले व पुढील काळात संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

बिनविरोध निवडीतून नव्याक पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून पतसंस्थेच्या विकासासाठी ते सकारात्मक भूमिका निभावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ