- जाहिरात -spot_img
breaking news

आनंदवार्ता! मान्सून सक्रिय; 8 दिवस राज्यात धो-धो पाऊस…

देशभरात सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पावसाची तूट
पुणे / नगर सह्याद्री :
राज्यात अद्यापही मान्सूनची प्रतिक्षा आहे. पाऊस न पडल्याने अनेक जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तसेच पेरणीचा हंगाम आल्याने शेतकऱ्याचे डोळेही आभाळाकडे लागले आहे. परंतु आता बळीराजासह सर्वसामान्यांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे.

राज्यात लवकरच पावसाला सुरूवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 20 तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस होणार आहे.

पश्चिम किनारपट्टीवर २४ जूनपासून पावसाचा जोर वाढू शकतो. २६ आणि २७ जूनच्या सुमारास तो उत्तर कोकणात पोहोचेल, असा अंदाज आहे. मुंबईत यंदा मान्सूनच्या विलंबाने आगमनाचा नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्राच्या भागातच अडकून पडला असून ४ ते १८ जून या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत ४१ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिली.

मात्र काही दिवसांपासून रखडलेली मान्सूनची वाटचाल पुढील आठवड्यात साधारण २४ ते २५ जूनपासून पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागांत मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

राज्यात जोरदार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, येत्या 21 जूनपासून ते 30 जूनपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. हा पाऊस सर्वत्र एकाचवेळी होणार नाही, मात्र तो वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये हजेरी लावेल.

पावसाची विदर्भातून सुरूवात होऊन, त्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं संपूर्ण राज्य मान्सून व्यापण्याची शक्यता आहे. 21 जून ते 30 जून हे आठ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल. तसेच शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, शेतातील ओल चांगली नसेल तर पेरणी करू नये, असं आवाहनही पंजाबराव डख यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा :  मुलीवर अ‍ॅसिड हल्ला, नागरिकांनी केले असे, काय म्हणाले पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ