- जाहिरात -spot_img
breaking news

सोनं झालं स्वस्त; दागिने खरेदी करणाऱ्यांना ‘गोल्डन’ चान्स, आजचा भाव पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
अमेरिका-इराणने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 2 हजार 800 रूपयांनी तर चांदीचा दरात ही 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. ऐन लग्नसराईत सोने स्वस्त झाल्याने दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. युद्धविराम असतानाही लेबनॉनवर भीषण हल्ले झाले आहेत. या हल्ल्यात जीवितहानी देखील झाली आहे. दुसरीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी देखील बंद केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम झाला आहे. यामुळे सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणाम हा जळगावमधील सराफा बाजारावर होताना दिसत आहे. जळगावात एक तोळे सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 53 हजार 675 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 46 हजार 170 रुपयांवर पोहोचला आहे. युद्ध थांबण्याचे घोषणा झाल्यास सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चढ उतार होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावात काल प्रति तोळ्यामागे सोन्याचा दर जीसएटीसह 1 लाख 56 हजार रुपये इतका होती. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 54 हजार रुपये इतका होता. कालच्या सोन्याच्या दराच्या तुलनेत आजची सोन्याची किंमत कमी झाल्याने गुंतवणूकदारांची खरेदीसाठी लगभग पाहायला मिळू शकते.

तत्पूर्वी, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर हा १५१,४८० रुपयांवर पोहोचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १३८,८५० रुपयांवर पोहोचला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर ११,२६१ रुपयांवर पोहोचला आहे.

हे सुद्धा वाचा :  शवविच्छेदन प्रक्रियेतील दिरंगाई! आमदार दाते यांनी झापल..
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ