- जाहिरात -spot_img
breaking news

गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद, केडगावमध्ये राडा, कारचे ऑईल तपासणे पडले महागात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
राहुरी | नगर सह्याद्री
अवैध अग्निशस्त्र बाळगणार्‍यांवर कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी तालुयात मोठी कारवाई केली आहे. उंबरे (ता. राहुरी) येथे दोन इसमांना ताब्यात घेत त्यांच्या कडून गावठी कट्टा, काडतुसे आणि कारसह एकूण ५ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

२० एप्रिल २०२६ रोजी राहुरी तालुयात गस्त घालत असताना पथकाला माहिती मिळाली की, दोन इसम पांढर्‍या रंगाच्या कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन फिरत आहेत. त्यानुसार पथकाने उंबरे येथील हॉटेल माऊली परिसरात सापळा रचला. संशयित वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दोन इसम आढळले. तपासात आरोपींची नावे विशाल वसंत पालवे (वय २८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) व सोमनाथ भानुदास मोरे (वय ३२, रा. शनि शिंगणापूर, ता. नेवासा) अशी असल्याचे समोर आले.

पंचासमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, २ हजार रुपये किमतीची दोन काडतुसे (एक जिवंत व एक मिसफायर), २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि ५ लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची कार असा एकूण ५.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई संदीप मुरकुटे, रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात, रमिझराजा आतार, अरुण मोरे, सोनल भागवत यांच्या पथकाने केली.

जुन्या वादातून मारहाण
अहिल्यानगर ःशहरातील केडगाव परिसरात जुन्या वादातून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळीने पती, पत्नी आणि मुलीला लोखंडी पाईप व लाकडी दांडयाने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी किरण लोंढे यांच्यात कुत्रा भुंकल्याच्या कारणावरून दुपारी वाद झाला होता. या वादाची तक्रार देण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. याचाच राग धरून रात्री आठ वाजेच्या सुमारास हॉटेल वैष्णवराज समोर संतोष सातपुते, किरण लोंढे, रामदास सातपुते, काशीनाथ मोढवे, बंडू सातपुते आणि तुन्या यांनी पीडित कुटुंबाला गाठले. आमच्या विरोधात तक्रार का देता? असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. यावेळी आरोपींनी लोखंडी पाईप आणि लाकडी दांडयाने कुटुंबातील सदस्यांवर हल्ला चढवला. यामध्ये फिर्यादीच्या पतीच्या पायावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली असून, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या मुलीलाही आरोपींनी अमानुषपणे मारहाण केली. हल्ल्यानंतर आरोपींनी पीडितांच्या दुचाकीची तोडफोड करून मोठे नुकसान केले. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडित कुटुंब दवाखान्यात असताना आरोपींनी त्यांच्या घरातील धान्याच्या गोण्यांचेही नुकसान केल्याचे समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा :  त्रिभुवनवाडी फाट्यावर अपघात; पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार...

केडगावमध्ये राडा
अहिल्यानगर ःशहरातील केडगाव परिसरात असलेल्या एका साडी डेपोसमोर लग्नाच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सौमित्र चंद्रशेखर रासने हे केडगाव परिसरात व्यापार करतात. सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते नगर-पुणे रस्त्यावरील एका साडी डेपो जवळ उभे होते. यावेळी आरोपी अक्षय राजू पवार तिथे आला आणि त्याने सौमित्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तुला मुलीशी लग्न करायचे आहे का? असे विचारत आरोपीने फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. हा वाद इतया विकोपाला गेला की, आरोपीने सौमित्र यांच्या कानाखाली मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर जवळच पडलेला दगड उचलून त्यांच्या डोयात मारून गंभीर जखमी केले. आरोपीने यावेळी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर सौमित्र रासने यांनी तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी अक्षय पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चालकाला कारचे ऑईल तपासणे पडले महागात
अहिल्यानगर ः अहिल्यानगर शहरालगत असलेल्या एमआयडीसी निंबळक रस्ता परिसरात एका चालकाला कारचे ऑईल तपासणे महागात पडले आहे. कारचे ऑईल लिकेज पाहत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी गाडीतील १ लाख ५९ हजार रुपयांची रोकड आणि शालेय साहित्य असलेली पिशवी लंपास केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाळू माधव कोतकर (वय ५५, रा. निंबळक) हे सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या मारुती वॅगनआर कारने निंबळक रस्त्यावरून जात होते. प्रशांत सोनवणे यांच्या गॅरेजसमोर त्यांना कारचे ऑईल गळत असल्याचे जाणवले. कोतकर हे गाडी खाली उतरून ऑईल तपासत असताना, पाळत ठेवून असलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कारच्या डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेली काळ्या रंगाची पिशवी अत्यंत शिताफीने चोरून नेली. या पिशवीत मोठी रोकड आणि महत्त्वाचे शालेय साहित्य होते.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ