- जाहिरात -spot_img
breaking news

टीव्ही-मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्याचा ग्रामस्थांचा संकल्प; वडगाव सावताळमध्ये घोषणांची मशाल पेटली

पारनेर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘आठवा पोषण पंधरवडा’ वडगाव सावताळमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुदृढ बालपण, सक्षम भवितव्य हा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी गावातून भव्य मशाल फेरी काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गाव पोषणाच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.

या पंधरवड्याचे मुख्य उद्दिष्ट बालकांच्या जीवनातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदू विकास हे आहे. यानिमित्ताने आयोजित उपक्रमात माता-बालक पोषण खेळ आणि संवादात्मक सत्रांच्या माध्यमातून पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. लहान मुलांमध्ये वाढत चाललेली मोबाईल आणि स्क्रीनची ओढ ही चिंतेची बाब असून, मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ कमी करून त्यांना खेळ, संवाद आणि सर्जनशील उपक्रमांकडे वळवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अंगणवाडी पर्यवेक्षिका लंके व सीडीपीओ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला वडगाव सावताळचे सरपंच संजय रोकडे, माजी चेअरमन दादाभाऊ रोकडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश तिखोळे यांच्यासह सरस्वती रोकडे, निर्मला खामकर, अनिता खामकर, रंजना खामकर, कल्याणी जाधव, शितल खामकर, सखुबाई कोळेकर, मनीषा रोकडे, नबाबाई सरोदे, अश्विनी खंडाळे, स्वाती खंडाळे, योगिता कोळेकर, निकिता मोरे, ऋतुजा गायकवाड आणि अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.पोषणाबाबतची ही जागरूकता हीच खरी भविष्यातील गुंतवणूक असल्याचे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. या उपक्रमामुळे गावात आरोग्यदायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

..तरच गावाचे आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल
केवळ पंधरवडा साजरा करणे हा आमचा हेतू नसून, पोषणाची ही मशाल प्रत्येक घरात कायमची पेटती राहावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य पद्धतीने झाला, तरच गावाचे आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल होईल.
– संजय रोकडे, सरपंच, वडगाव सावताळ

कुपोषणमुक्त गावाचा निर्धार
‘मूठभर धान्य – ‘अक्षय पात्र’ या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक सहभागातून पोषणाची साखळी मजबूत करून गाव पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. अंगणवाडी केंद्रातील सुविधा, आहाराचे वितरण आणि स्वच्छतेबाबत चर्चा करून सुधारणांसाठी सामूहिक दिशा निश्चित करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  शेवगाव पोलीस ऍक्शन मोडवर; सालवडगावचा मावा कारखाना उद्ध्वस्त; ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ