- जाहिरात -spot_img
breaking news

‘धर्मरक्षक केसरी’साठी दिग्गज मल्ल आमनेसामने; सिकंदर शेख विरुद्ध हर्षद सदगीर यांच्यात अटीतटीचा मुकाबला!

अळकुटीत रंगला कुस्त्यांचा महासंग्राम; ऐतिहासिक मैदानात चपळाई आणि ताकदीचे दर्शन
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील कुस्तीप्रेमींसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. पैलवान ग्रुप, टायगर ग्रुप आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलच्या मैदानावर भव्य निकाली कुस्त्यांचा महासंग्राम उत्साहात संपन्न झाला. या मैदानातील चुरशीच्या लढतींनी उपस्थित हजारो कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ नेते व माजी सभापती मधुकरराव उचाळे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या मल्लांनी आपल्या कौशल्याने आखाडा गाजवला.या कुस्ती महोत्सवाचे मुख्य आकर्षण ‘धर्मरक्षक केसरी’ या किताबासाठी झालेली लढत होती. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (मोहळ) आणि महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर (नाशिक) हे दोन दिग्गज मल्ल समोरासमोर ठाकले होते. जवळपास १५ मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या झुंजीत दोन्ही मल्लांनी एकमेकांवर नेत्रदीपक चढाया केल्या. या कुस्तीसाठी पंच म्हणून ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकरराव उचाळे व टायगर ग्रुपचे अध्यक्ष तान्हाजी जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.विजेत्या मल्लासाठी ३ लाख रुपये रोख आणि मानाची गदा बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती.

उद्योजक सोपान लंके, राजू शेख आणि सुनील शेटे यांनी या मुख्य कुस्तीसाठी बक्षीस सौजन्य दिले होते. कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उद्योजक कैलास आवारी, उद्योजक सदानंद आवारी, उद्योजक विजय आवारी, जिल्हा परिषद सदस्य अमित घनदाट, उद्योजक राजेंद्र शिंदे, संजय बाबर, अल्ताफ शेख, दीपक ठोंबरे, बंडू साबळे, श्रीकांत डेरे, जितेश सरडे, जि. प. सदस्य वैभव काळे, पै. युवराज पठारे, उद्योजक भाऊ गोरडे, पै. अमोल लंके, बापू कड, सागर मैड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. यावेळी माजी सभापती मधुकर उचाळे, टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तान्हाजी जाधव, राष्ट्रवादीचे नेते दीपक(अण्णा) लंके यांच्यासह शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. भास्कर शिरोळे, धर्मरक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष पै. सुभाष वराळ, शिरापूर सरपंच गुंडाभाऊ भोसले, ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे, बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर, माजी सभापती बाबासाहेब तांबे, राष्ट्रवादीचे नेते जितेश सरडे, नगराध्यक्ष डॉ. विद्या कावरे, निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर, माजी सरपंच अशोक घुले, उपसरपंच संतोष काटे, उद्योजक नितीन (स्वामी) दांगट, टायगर ग्रुप तालुकाध्यक्ष सुनील म्हस्के, महेश दाते, सचिन मोरे, किरण चौधरी, आदेश बरकडे, बाळासाहेब पुंडे, रविंद्र राजदेव, किरण ठुबे, कोरठण खंडोबा देवस्थानचे सचिव चंद्रभान ठुबे, नगरसेवक पै युवराज पठारे, राष्ट्रवादीचे नेते अमोल उगले, निलेश लंके प्रतिष्ठानचे कारभारी पोटघन मेजर, नगरसेवक अमित जाधव, भाळवणी गणाचे नेते अभयसिंह नांगरे, लाला भोंडवे, पाबळ सरपंच संदेश कापसे, दिनेश चौगुले, पै. शिवा उचाळे, सरपंच दत्ता म्हस्के, उपसरपंच रामभाऊ तराळ, अंकुश चौधरी, जयदीप सालके, स्वप्निल आतकर, माजी सरपंच गणेश मापारी, किरण पानमंद, दत्ता म्हस्के, बाळासाहेब दिघे, गणेश तांबे, गणेश मोरे, चंद्रभान खेमनर, बंटी दाते, सुरज नवले, वर्षाताई गंधाक्ते, लहू साबळे, उत्तम घोलप, हंगेश्वर धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. पारनेर पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

हे सुद्धा वाचा :  अबब! नगरपरिषदेच्या दारातच साचले तळे, जामखेडकर संतप्त!

महिला कुस्तीगिरांचा डंका
या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे महिला कुस्तीगिरांचा सहभाग. धनश्री फंड, साक्षी पाटील, लावण्या गोडसे, प्राजक्ता रणसिंग या महिला मल्लांनीही आखाड्यात आपले कसब दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. श्री साईनाथ हायस्कूलचे मैदान कुस्तीप्रेमींनी अक्षरशः फुलून गेले होते. शिस्तबद्ध नियोजन आणि दिग्गज मल्लांच्या उपस्थितीमुळे अळकुटीतील ही कुस्ती स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे.

पारनेर तालुक्याने कुस्तीचा वारसा जपला
पारनेर तालुयाने कुस्तीचा जो वारसा जपला आहे, तो पाहून अभिमान वाटतो. सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर यांसारख्या महान मल्लांना आपल्या आखाड्यात पाहणे ही केवळ पर्वणी नसून, ग्रामीण खेळाडूंसाठी मोठी प्रेरणा आहे. महिला कुस्तीगीरांचा वाढता सहभाग आणि कुस्तीप्रेमींची अथांग गर्दी हेच या भव्य आयोजनाचे खरे यश आहे.
– पै. मधुकरराव उचाळे,
माजी सभापती जिल्हा परिषद

पै. चेतन रेपाळेची चित्तथरारक खेळी
मैदानातील दुसरी महत्त्वाची आणि चित्तथरारक लढत महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील कांस्यपदक विजेता पै. चेतन रेपाळे आणि पै. अनिकेत मांडगे यांच्यात झाली. दोन्ही मल्लांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, मात्र, अखेर चेतन रेपाळे याने आपल्या चपळाईच्या जोरावर विजयश्री खेचून आणली.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ