- जाहिरात -spot_img
breaking news

नगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीवर २०० खर्च; तरी रस्ता खड्ड्यात

ठेकेदार, अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : पै रावसाहेब खेवरे

 
जनआंदोलन उभे करण्याचा इशारा
राहुरी/ नगर सह्याद्री
नगर-मनमाड (एनएच-१६०) महामार्गाच्या दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत शेकडो कोटी रुपये खर्च होऊनही रस्त्याची अवस्था बिकट झाली असून, निकृष्ट कामामुळे झालेल्या अपघातांसाठी संबंधित ठेकेदार, सुपरव्हिजन कन्सल्टंट आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे नेते पै. रावसाहेब खेवरे यांनी केली आहे. 
 या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. रावसाहेब खेवरे यांनी जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रशासनाला निवेदन दिले. यामध्ये त्यांनी नगर – मनमाड रस्त्याच्या निकृष्ट कामाचा भांडाफोड करत ठेकेदार आणि अधिकारी ही शासनाला कशी चुकीची माहिती देत आहेत, हे निदर्शनास आणून दिले आहे.
नगर–सावळीविहीर महामार्ग दुरुस्तीवर शेकडो कोटी खर्च
गेल्या चार ते पाच वर्षांत नगर–सावळीविहीर महामार्गाच्या दुरुस्तीवर सुमारे १०० ते २०० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. शिंदे डेव्हलपर्स, मनीषा कन्स्ट्रक्शन, जय हिंद रोड बिल्डर आदी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची देयके अदा करण्यात आली. मात्र, एवढा खर्च करूनही रस्त्याची अवस्था सुधारली नसल्याने या संपूर्ण कामाची आणि खर्चाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 
हे सुद्धा वाचा :  सुपा-पारनेर रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ