- जाहिरात -spot_img
breaking news

पावसाळ्यापूर्वी मनपाने घेतला ‘हा’ निर्णय, असे आहे नियोजन

पहिल्या टप्प्यात सोमवारपासून तीन ओढे नाल्यातील साफसफाई सुरू / टप्प्याटप्प्याने मशीन वाढवून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करणार : आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात तीन प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने मशीनची संख्या वाढवून सफाईच्या कामाला गती देण्यात येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामासाठी महानगरपालिकेने नियोजन करून कामाला सुरुवात केली आहे. सोमवारी सनी पॅलेस ते अभियंता कॉलनी, भगवान बाबा चौक, शिरसाठ मळा, गावडे मळा, गजराज ड्रायक्लिनर, डी मार्ट, अर्जुन वॉशिंग सेंटर, कराळे क्लब हाऊस, सिना नदीपर्यंत, तसेच कला नगर, नरहरी नगर, कुष्ठधाम रोड, रासने नगर, पंचशील हॉटेल, बालिकाश्रम रोड, शिंदे मळा, ताठे मळा, भूतकरवाडी पम्पिंग स्टेशन सीनानदीपर्यंत या सावेडी उपनगरातील दोन प्रमुख नाल्यांची व सारसनगर परिसरातील भिंगार नाल्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. तीन पोकलेन मशीन उपलब्ध करून हे काम सुरू करण्यात आले आहे. उद्या आणखी एक मशीन उपलब्ध होईल व आणखी एका नाल्याची साफसफाई सुरू होईल.

शहरातील सर्व ओढे व नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाला याबाबत सूचना देण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने पोकलेन मशीनची संख्या वाढवून कामाला गती देण्यात येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केले जाईल. नालेसफाई दरम्यान ओढे व नाल्यातून काढण्यात आलेला गाळ तेथेच न टाकता तो तात्काळ उचलून नेण्याबाबतही उपाययोजना व नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :  महिलेवर अत्याचार; त्रासाला कंटाळून पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, बकऱ्यांच्या पैशांवरून वाद; पती-पत्नीला बेदम मारहाण...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ