- जाहिरात -spot_img
breaking news

रोज थोडावेळ ध्यान केल्याने परमेश्वराशी नाते दृढ होते : संत राजिंदरसिंहजी महाराज

दर्शन व प्रवचन सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

आपले उद्दिष्ट मिळवण्यासाठी सर्वांनी आध्यात्मिक मार्गावर चालून प्रयत्न केल्यास अधिकाधिक प्रगती होईल. जगात जशी प्रगती होत आहे तशीच आपल्या अंतर्मनातही प्रगती होणे आवश्यक आहे. ज्यांना परमात्म्याला प्राप्त करायचे आहे त्यांनी स्वतःला ओळखून आपल्या अंतरात्म्याला ध्यानधारणेने शुद्ध करणे आवश्यक आहे. भरकटलेली बुद्धी एकाग्र करण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे रोज थोडावेळ ध्यान कल्याने परमेश्वराशी नाते दृढ होते. सत्संगातून मिळणारे ज्ञान जीवन अधिक समृद्ध व सुखकर बनवते. त्यामुळे अशा आध्यात्मिक पर्वणीचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. अहिल्यानगरमध्ये एवढ्या मोठ्या मंडपात मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना पाहून माझ्या मनात आनंदाला भरती आली आहे, आशा शब्दांत विश्वविख्यात आध्यात्मिक संत राजिंदर सिंहजी महाराजांनी अहिल्यानगरमध्ये भाविकांना मार्गदर्शन करून ध्यानाचे महत्त्व सांगितले.

आध्यात्मिक संतसद्गुरू आणि सावन कृपाल रुहानी मिशनचे प्रमुख संत राजिंदरसिंहजी महाराज यांचे मंगळवारी सायंकाळी अहिल्यानगरमध्ये आगमन झाले. मिस्कीननगर येथील कार्यक्रमस्थळी देश विदेशांतून आलेल्या हजारो भाविकांनी त्यांचे जयजयकार करत टाळ्यांचा कडकडाट करून भक्तिभावाने स्वागत करून त्यांच्या दर्शनचा लाभ घेतला. यावेळी महाराजांनी प्रसन्न भावमुद्रेने उपस्थिती भाविकांना हात जोडून अभिवादन केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील सावन कृपाल आश्रमच्या विविध सेंटरमधील छोट्या मुलामुलींनी ‘आज सद्गुरू आये, सब के जीवके भाग जगाये’ या स्वागत गीताने महाराजांचे स्वागत केले.

दोन दिवसाच्या या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक नगर जिल्ह्यासह देश विदेशांतून उपस्थित होते. सद्गुरूंच्या दर्शनाने अनेक भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.यावेळी संत राजिंदर सिंहजी महाराजांनी उपस्थित हजारो भाविकांना पाच मिनिट डोळे बंद करून ध्यान करण्यास सांगून ध्यानाचे महत्त्व सांगून थोडयात मार्गदर्शन केले. त्यानंतर सजवलेल्या छोट्या इलेट्रिक गाडीत बसून संपूर्ण मंडपाला फेरफटका मारून उपस्थित भाविकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी हस्तदोलन करून आशीर्वाद दिले. यावेळी सद्गुरूंना भेटल्यावर अनेकांचे डोळे पाणावले.संत राजिंदर सिंहजी महाराजांच्या दर्शन सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांसाठी लंगर प्रसादाची तसेच इतर सर्व अत्यावश्यक सोय करण्यात आली.

हे सुद्धा वाचा :  क्रिकेटच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; फोटो काढल्याचा संशय, तरुणांवर हल्ला, हुंड्यासाठी छळ...

अत्यंत शिस्तीत पार पडलेल्या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सावन कृपाल रुहानी मिशनचे शेकडो स्वयंसेवक व अहिल्यानगरचे पदाधिकारी व भाविक राबत होते. मंगळवारी सायंकाळी सावेडी भागात पावसाच्या जोरदार सरी पडल्या. पण कार्यक्रमासाठी मिस्कीननगरच्या मैदानात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जर्मन हँगर पद्धतीचा वॉटरप्रूफ मांडवामुळे कार्यक्रमावर पावसाचा कोणताही परिणाम झाला नाही.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ