- जाहिरात -spot_img
breaking news

राज्याला उन्हाचा चटका, तापमान ४० शी पार; मान्सूनची स्थिती काय? हवामानाचा अंदाज

मुंबई / नगर सह्याद्री –
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट आणि पूर्वमोसमी वादळी पावसाची दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार असून काही ठिकाणी वादळी पावसाचीही शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मान्सून १६ मे रोजी अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असून अद्याप तो जैसे थे आहे. ५ ते ६ जून पर्यंत तो महाराष्ट्रात येण्याची शक्यता असून त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान ४४ ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उन्हाच्या कडाक्याला सामोरे जावं लागणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने या भागांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि विजेपासून दूर राहावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील अनेक भागांत उष्णतेचा उच्चांक नोंदवण्यात आला. अमरावती, वर्धा, अकोला, ब्रह्मपुरी आणि यवतमाळ येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. परभणी येथे ४४ अंश, तर सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, नागपूर आणि वाशीम येथे ४३ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. याउलट, महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात कमी २०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अंदमान-निकोबार परिसरात प्रवेश केला असून मॉन्सूनच्या पुढील प्रवासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :  मार्च हिटने महाराष्ट्र होरपळणार; हवामान खात्याकडून काय दिलाय अलर्ट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ