- जाहिरात -spot_img
breaking news

रॅम्प वॉकवरून अनित पड्डा ट्रोल; अभिनय कर, मॉडेलिंग नाही!

मुंबई – ‘सैयारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री अनित पड्डा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत असताना, अलीकडेच केलेल्या रॅम्प वॉकमुळे तिला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे.
तिचा रॅम्प वॉक व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकांनी तिच्या स्टाइल आणि चालण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

अनित पड्डाने एका फॅशन शोमध्ये शोस्टॉपर म्हणून रॅम्प वॉक केला. या कार्यक्रमात ती प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘पेरो’साठी रॅम्पवर उतरली होती. तिने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये टेक्सचर्ड डिझाइन आणि त्यावर एक क्रॉप जॅकेट होते, जे थोड्या हटके आणि तरुणाईला साजेसं स्टाइल स्टेटमेंट दाखवत होतं. हा लूक ‘जेन झी’ थीम लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. मात्र, हा फॅशन प्रयोग अनेकांना आवडला नाही. काहींना तिच्या कपड्यांची फिटिंग योग्य वाटली नाही, तर काहींनी डिझाइन आणि स्टाइलिंगवरच प्रश्न उपस्थित केले. सोशल मीडियावर अनेकांनी कमेंट करत सांगितलं की, हा ड्रेस तिच्यावर शोभत नाही आणि संपूर्ण लूक थोडा विचित्र वाटतो. काहींनी तर थेट म्हटलं की, “हा आउटफिट चुकीचा निवड आहे.” याशिवाय, सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या रॅम्प वॉकची.

अनेकांना वाटलं की तिच्या चालण्यात आत्मविश्वासाची कमतरता होती. प्रोफेशनल मॉडेल्ससारखी ग्रेस आणि स्टाईल तिच्या वॉकमध्ये दिसली नाही, अशी टीका करण्यात आली. काही युजर्सनी विनोद करत म्हटलं की, “ही रॅम्प वॉक नाही, पार्कमध्ये चालल्यासारखं वाटतंय.” तर काहींनी तिला थेट सल्ला दिला की, “मॉडेलिंग मॉडेल्ससाठीच सोडून दे, तू फक्त अभिनयावर लक्ष दे. रेडिट आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. काही प्रतिक्रिया अतिशय कठोरही होत्या, ज्यामुळे अनित पड्डा पुन्हा एकदा ट्रोलिंगच्या भोवऱ्यात अडकली आहे.

मात्र, अशा टीकेच्या पार्श्वभूमीवरही तिच्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आणि हा फक्त एक वेगळा प्रयोग असल्याचं सांगितलं. दरम्यान, या सगळ्या वादांनंतरही अनित पड्डा तिच्या कामामुळे इंडस्ट्रीत आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. ‘सैयारा’नंतर तिची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता ती ‘शक्ती शालिनी’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे, जो मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत आहे. या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची झलक दाखवणार आहे.

हे सुद्धा वाचा :  तेजश्री प्रधानचा 'मॅजिकल' लूक सोशल मीडियावर व्हायरल! शॉर्ट वनपीसमध्ये वेधलं चाहत्यांचं लक्ष
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ