मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमी चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून तिचं नाव शिखर पहाडियासोबत जोडलं जात आहे. जरी या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सोशल मीडिया पोस्ट आणि एकत्र दिसणाऱ्या त्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्या नात्याबद्दल सातत्याने चर्चा होत असते.
आता पुन्हा एकदा जान्हवी कपूर तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिच्या कपड्यांवरील एका मजेशीर संदेशाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते त्यावर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

अलीकडेच एका इन्स्टाग्राम पेजवर जान्हवीचा एक फोटो शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस आणि त्यावर राखाडी रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. मात्र, तिच्या ड्रेसवरील एका ओळीने सर्वांची उत्सुकता वाढवली.
त्या टी-शर्टवर इंग्रजीमध्ये लिहिलं होतं, “If lost, please return to Shikhar Pahariya”, म्हणजेच “जर मी हरवले, तर कृपया मला शिखर पहाडिया यांच्याकडे परत करा.”
हा संदेश पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी ही प्रेम व्यक्त करण्याची खूपच गोंडस आणि वेगळी पद्धत असल्याचं म्हटलं. काहींनी हार्ट इमोजी पोस्ट केले, तर काहींनी या जोडीचं कौतुक केलं.
जान्हवी आणि शिखर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. दोघे अनेकदा एकत्र प्रवास करताना, धार्मिक स्थळांना भेट देताना आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना दिसले आहेत. गेल्या वर्षी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यानही शिखर जान्हवीसोबत दिसला होता.

याआधीही जान्हवीने शिखरबद्दलचं प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं होतं. काही दिवसांपूर्वी तिने शिखरच्या नावाचं पेंडंट असलेला नेकलेस परिधान केला होता. आता नाईट ड्रेसवरील या खास संदेशामुळे पुन्हा एकदा त्यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिचा आणि दक्षिणात्य सुपरस्टार राम चरण यांचा बहुचर्चित ‘पेड्डी’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. चित्रपटातील जान्हवीच्या लूकवरून काही प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर निर्मात्यांनी काही बदल केल्याचीही चर्चा होती.
‘पेड्डी’ हा जान्हवी कपूरचा दुसरा टॉलीवूड चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांबरोबरच ती आता दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. सध्या मात्र तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याचीच जास्त चर्चा सुरू आहे. अधिकृतरीत्या नात्याची घोषणा न करताही जान्हवी आणि शिखर सतत एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये या जोडीबद्दलचं आकर्षण आणखी वाढलं आहे.










