- जाहिरात -spot_img
breaking news

राहुरी विद्यापीठ परिसरात तरुणीचा विनयभंग

दुसऱ्याबरोबर लग्न केले तर मारून टाकण्याची धमकी

राहुरी | नगर सह्याद्री
तू माझ्याशी लग्न करायचे, मला सोडून दुसऱ्या बरोबर लग्न केले तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन आरोपीने एका अल्पवयीन कॉलेज तरुणीचा विनयभंग केल्याची घटना राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथे घडली.

अल्पवयीन मुलगी राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील एका गावात कुटुंबासह राहत आहे. तरुणीचे 12 वी बोर्डाचे पेपर कृषी विद्यापीठ राहुरी येथे असल्याने दि. 11 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तरुणी विद्यापीठ येथे पेपर देण्याकरिता आली. आरोपी तेथे आला. त्याने तरुणीला गाडीत बसवले. दोघांचे फोटो त्याचे मोबाईलमध्ये काढले. नंतर तिचा हातपकडून जवळ ओढले आणि लज्जा उत्पन्न होईल, असे गैरवर्तन केले. त्यानंतर जूनमध्ये आरोपीने तरुणीला फोन करुन शिवीगाळ केली. तू माझ्याशी लग्न करायचे, मला सोडून दुसऱ्याबरोबर लग्न केले तर तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. दि. 7 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपीने तरुणीच्या एका नातेवाईकाच्या मोबाईलवर फोन करून म्हणाला की, तुम्ही तरुणीचे लग्न ज्या मुलाबरोबर करणार आहेत, त्याला आमचे दोघांचे फोटो दाखवून लग्नात आमच्या समाजाचे सर्व लोक घेऊन येतो, मग बघा काय होते, अशी धमकी दिली.
आरोपीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून आरोपी ओंकार प्रभाकर उर्फ महम्मद वैरागर (रा. ब्राम्हणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमधील 'त्या' घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा ; आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ