- जाहिरात -spot_img

नगरमध्ये वीज प्रवाहामुळे दोन म्हशींचा मृत्यू; ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार, ऑईल चोरीला

दोन जणांवर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

भिंगार जवळील बाराबाभळी शिवारात एका शेतात विजेचा तीव्र धक्का लागून दोन दुभत्या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे दूध व्यावसायिक शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दोघा जणांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश सतीश आहेरगवळी (वय 40 वर्षे, रा. बाराबाभळी, ता. जि. अहिल्यानगर) हे दूध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवार, 29 जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या म्हशी बाराबाभळी शिवारातील म्हशानखाणीच्या परिसरात नेहमीप्रमाणे चरत होत्या. याच परिसरात सार्वजनिक हायमॅक्स विजेचा खांब आहे.

या गावातील रहिवासी आरोपी अशोक कराळे आणि आबा कराळे या दोघांनी मिळून सार्वजनिक विजेच्या खांबावरून अनधिकृतपणे विजेचा आकडा टाकला होता. या टाकलेल्या वायरमधील वीज प्रवाह संपूर्ण परिसरात आणि जमिनीत उतरला होता. म्हशी चरत असताना या धोकादायक वीज प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला. या भीषण अपघातात एक जाफराबादी आणि एक म्हशान जातीची म्हैस जागीच दगावली.जनावरांचा मृत्यू झाल्याचे पाहून फिर्यादी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी अशोक कराळे आणि आबा कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अकोलकर या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार, ऑईल चोरीला
एक लाख 39 हजारांचा ऐवज लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री

भिंगार जवळील जामखेड रस्त्यावरील एका भागात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने तांब्याची तार आणि ऑईल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात महेश जालिंदर गुंजाळ (वय 36, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 जून 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास जामखेड रस्त्यावरील राजेंद्र सिंग यांच्या क्षेत्राजवळ असलेल्या 160 केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला चोरट्यांनी लक्ष्य केले. अज्ञात चोरट्याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या ट्रान्सफॉर्मरमधून 1 लाख 20 हजार रुपये किमतीची 120 किलो तांब्याची तार आणि 19 हजार रुपये किमतीचे 210 लिटर ट्रान्सफॉर्मर तेल चोरून नेले. एकूण 1 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या घटनेनंतर महेश गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून 29 जून रोजी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर. एस. मिसाळ करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  तरुणावर चाकूने हल्ला, दुकानदाराची चार लाखांची फसवणूक, गॅस रिफीलिंगवर छापा

एमआयडीसीतील मॅट्रिक्स इंजिनिअरिंग कंपनीत चोरी
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
येथील एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या एका नामांकित कंपनीतून साहित्य चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कसबे वस्ती तपोवन रोड येथील रहिवासी आणि खाजगी नोकरी करणारे तुषार अशोक सोनवणे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी एमआयडीसी भागातील ब्लॉक नंबर एफ-04/1 मध्ये असलेल्या मॅट्रिक्स इंजिनिअरिंग टेक्निक्स कंपनीत झाली. 21 जूनच्या रात्री साडेआठ वाजेपासून ते 22 जूनच्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने या कंपनीला लक्ष्य केले. कंपनीच्या बाहेरील बाजूला सुरक्षित ठेवलेले महागडे साहित्य लबाडीच्या इराद्याने चोरून नेण्यात आले.

या घरफोडीमध्ये कंपनीचे महत्त्वाचे सुटे भाग आणि इतर साहित्य चोरीला गेले आहे. यामध्ये वीस हजार आठशे रुपये किमतीचे दोन महत्त्वाचे जॉब पार्ट आणि तीन हजार रुपये किमतीच्या दोन प्रवासी पिशव्यांचा समावेश आहे. एकूण 23 हजार 800 रुपये किमतीचा हा मुद्देमाल असून चोरट्याने कोणतीही पूर्वकल्पना किंवा संमती नसताना हा ऐवज लंपास केला.या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने सक्रिय झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पोलीस अंमलदार सांगळे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

भरदिवसा सोन्याच्या साखळीची चोरी
अहिल्यानगर: शहर परिसरातील चांदणी चौक भागातील डी.ए.डी. कॉलनीमध्ये एक धाडसी चोरीची घटना उघडकीस आलेी. घरासमोरून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजन ओमप्रकाश तिवारी या कामानिमित्त अहिल्यानगर येथे चांदणी चौक परिसरातील कॉलनीमध्ये आल्या होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या एका अज्ञात चोरट्याने त्यांचा माग काढला. चोरट्याने कोणतीही चाहूल लागू न देता त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली. चोरट्याने चोरून नेलेली सोन्याची साखळी सुमारे 8 ग्रॅम वजनाची असून तिची किंमत 50 हजार रुपये आहे. चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी ही चोरी केली.

हे सुद्धा वाचा :  अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपार्ई द्या; पारनेरमध्ये शिवसेनेचा मोर्चा, काय आहेत मागण्या...

 

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com