- जाहिरात -spot_img
breaking news

खर्ग बेटाजवळ तेलगळती !

खर्ग बेटाजवळ तेलगळती !
जागतिक बाजारात चिंता
नवी दिल्ली वृत्तसंस्था
एकिकडे अमेरिका-इराण युद्धामुळे जग तेल संकटात असताना, इराणच्या खर्ग आयलंड जवळ समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तेल गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेल पुरवठा अधिक विक्सळीत होऊन जागतिक बाजारात तेलाच्या किंमती अधिक वधारण्याची शक्यता वर्तवली जात असून, सामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
युरोपच्या कोपरनिकस उपग्रह प्रणालीने टिपलेल्या काही फोटोंमध्ये खर्ग बेटाच्या पश्चिम भागात तेलाचा तवंग दिसून आला आहे. तज्ज्ञांच्या मते, ही गळती सुमारे 45 ते 50 चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरली आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी तेलगळती असू शकते.
खर्ग आयलंड हे इराणच्या 90 टक्के तेल निर्यातीचे मुख्य केंद्र आहे.अमेरिकेने आधीच होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केल्याने शेकडो तेलाचे टँकर अडकून पडले आहेत. भारत आपल्या गरजेपेक्षा 80 ते 85 टक्के तेल आयात करत असून, खर्ग आयलंडजवळील या तेल संकटामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलरची वाढ झाल्यास, याचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर होईल.
खर्ग आयलंडजवळील समुद्रात झालेल्या प्रचंड तेल गळतीचा परिणाम केवळ जागतिक तेल बाजारावरच नाही, तर सागरी जीवसृष्टीसाठीही अत्यंत घातक ठरणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुरू असते, ज्यावर तेथील स्थानिक अर्थव्यवस्था अवलंबून आहे. ही तेलगळती लवकरात लवकर रोखली गेली नाही, तर मध्य-पूर्वेतील पर्यावरणाला कधीही भरून न काढता येणाऱ्या भीषण नुकसानीला समारे जावे लागण्याची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात

हे सुद्धा वाचा :  'या' तीन अटी मान्य करा युद्ध थांबवतो... इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलं ट्विट
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ