- जाहिरात -spot_img
breaking news

बाबुर्डी बेंद येथे दोन दिवस खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्ताने दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबुर्डी बेंद ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

सालाबादप्रमाणे कालाष्टमीला 10 एप्रिल 2026 रोजी खंडोबा यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्ताने भाविक जेजुरी येथील कऱ्हा नदी पात्रातून कावडीने पाणी आणतात. शुक्रवारी सकाळी कावडधारकांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. कावडधारक सकाळी आठ वाजता देवाला पाणी घालतील. सायंकाळी सात वाजता महाआरती होईल. त्यानंतर काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री जागरण गोंधळ कार्यक्रम होईल.

11 एप्रिल 2026 रोजी भव्य आर्क्रेस्ट्राचे नियोजन करण्यात आले आहे. दोन दिवस खाऊचे व खेळण्याचे दुकाने राहणार आहेत. यात्रेनिमित्त होणार्‍या विविध कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाबुर्डी बेंद ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेर राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त; महत्वाचे कारण आले समोर...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ