- जाहिरात -spot_img
breaking news

वाळवणे ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय; २२ एप्रिलपर्यंत पशुहत्या बंद; का घेतला निर्णय पहा

यात्रेदरम्यान भाविकांनी निर्णयाचे काटेकोरपणे पालन करावे
सुपा | नगर सह्याद्री

राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुयातील वाळवणे गावात ४५ दिवस पशुहत्या न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मात्र यावर्षी यात्रेदरम्यान मांसाहार करणारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. यात्रेदरम्यान याठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. या दरम्यान मोठ्या प्रमाणात पशुहत्या केली जाते. यावर्षी प्रथमच ती केली जाणार नसल्याने मांसाहार घेणार्‍यांचा चांगलाच हिरमोड होणार आहे. मात्र यात्रेदरम्यान इतर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार पार पडतील अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पठारे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

श्री क्षेत्र वाळवणे या पावनभूमीत श्री काळ भैरवनाथांचा भव्य दिव्य कलशारोहण सोहळा नुकताच जगद्गुरू श्री शंकराचार्यांच्या उपस्थितीमध्ये गेल्या ०५ मार्च रोजी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडला. त्या अनुषंगाने ३५० जोडप्यांच्या हस्ते तीन दिवस पुरोहितांकडून विधिवत पूजा व मंत्रोपचार करण्यात आला. म्हणून पुढील ४५ दिवस म्हणजेच २२ एप्रिल २०२६ पर्यंत पशुहत्या व मांसाहार न करण्याचे पुरोहितांकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकमुखाने पशुहत्या न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक ०३ एप्रिल २०२६ व ०४ एप्रिल २०२६ रोजी श्रीनाथांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे त्यात पशु हत्या व मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करण्यात आला आहे. मात्र बाकीचे सर्व विधिवत कार्यक्रम म्हणजेच श्री नाथांचा छबिना, पालखी, कुस्त्यांचा आखाडा आदी सर्व कार्यक्रम सालाबाद प्रमाणे पार पाडणार आहेत. वरील निर्णय श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ वाळवणे यांच्या सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचे येणार्‍या भाविकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा :  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पै. चेतन रेपाळेची निवड ; शिवछत्रपती कुस्ती संकुलाच्या शिरपेचात मानाचा तुरा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ