मुंबई / नगर सह्याद्री :
राज्यात काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे ढग होते. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात बऱ्याच भागात गारांचा पाऊस झाला. अनेक भागात मुसळधार पावसाचे अंदाज होते. आता मात्र प्रचंड उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा पुन्हा एकदा 40 च्या घरात जाताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यभरात प्रचंड उकाडा आणि उन्हाचा कडाका जाणवणार आहे. तर मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.
भारतीय हवामान विभागाने दोन दिवस मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज यलो अलर्ट जारी केला आहे. तर मराठवाडा विदर्भात काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या लाटा आणि मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा आहे.
हवामान विभागाचे अलर्ट कुठे?
23 मार्च- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी- उष्णतेचा येलो अलर्ट
सांगली, सातारा, सोलापूर ,धाराशिव ,लातूर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट
24 मार्च- मुंबई ,ठाणे ,रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट
सोलापूर धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट, सातारा सांगली पुणे हिंगोली या जिल्ह्यांना तुरळक पावसाची शक्यता
25 मार्च: सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, मुसळधार पावसाचा यलो अलर्ट मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
26 मार्च- यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट










