- जाहिरात -spot_img
breaking news

कान्हूर पठारमध्ये संतापजनक प्रकार, अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, पोलिसांनी केले असे…

पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर व धक्कादायक वळण घेत आहे. या प्रकरणात आता आणखी एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून, यामुळे संपूर्ण तालुयात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे. पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या जबाबानुसार, पारनेर पोलीस ठाण्यात ओम आल्हाट आणि रोहित चत्तर या दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडित मुलगी दहावीची विद्यार्थिनी असून तिची ओळख आरोपी ओम आल्हाट (रा. कान्हूर पठार) याच्याशी आठवडा बाजारामध्ये झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत ओमने तिला लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधली. तिच्यावर शरीरसंबंधासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. मुलीने या गोष्टीला ठाम नकार दिला असता, तुझ्याबद्दल सर्वांना सांगेन अशी धमकी देऊन त्याने तिला मानसिक छळाला सामोरे जाण्यास भाग पाडले.जानेवारीमध्ये पीडित मुलगी आपल्या मैत्रिणींसह शाळेत जात असताना आरोपी ओम आल्हाट व रोहित चत्तर यांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले. मुलीने प्रतिकार केला असता तिला धमकावून निघोज परिसरातील एका लॉजवर नेण्यात आले. तेथे रोहित चत्तर याने गाडी बाहेर उभी केली, तर ओम आल्हाट याने मुलीला बळजबरीने खोलीत नेऊन तिच्यावर दोनवेळा अत्याचार केला.

या कृत्यानंतर तिला पुन्हा कान्हूर पठार येथे आणून सोडण्यात आले.एवढ्यावरच न थांबता, आपल्या दोघांचे लॉजवरचे फोटो माझ्याकडे आहेत, ते मी व्हायरल करील अशी धमकी देऊन ओमने तिला पुन्हा ब्लॅकमेल केले. याच भीतीपोटी ती मुलगी काही काळ गप्प राहिली. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी आरोपीने तिला पुन्हा अनिल साळवे याच्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. अखेर धीर एकवटून मुलीने हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर, महिला पोलीस व सामाजिक संघटनांच्या उपस्थितीत तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पॉसो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हे सुद्धा वाचा :  संत शेख महंमद महाराजांची दिंडी विठुरायाच्या भेटीसाठी रवाना

कठोर कारवाईची मागणी
अल्पवयीन मुलींवरील सलग अत्याचाराच्या घटनांमुळे कान्हूर पठार व पारनेर तालुयात संतापाचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, पीडितांना न्याय मिळावा आणि अशा घटनांना आळा बसावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ