- जाहिरात -spot_img
breaking news

चप्पलवरून पोलिसांनी लावला छडा

खर्ड्यात कामगारांच्या मोबाईलवर
चोरट्यांचा डल्ला; दोघांना अटक
जामखेड | नगर सह्याद्री

खर्डा शहरातील बांधकाम मजुरांच्या राहत्या खोलीत घुसून चार मोबाईल फोन चोरी करणाऱ्या आरोपींचा खर्डा पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला. घटनास्थळी सापडलेल्या एका संशयास्पद चप्पलीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत स्थानिक युवकासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून चोरीचे चारही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

बाहेर राज्यातील काही कामगार हे खर्डा शहरातील कुरमुडे यांच्या शाळेच्या बांधकामाचे काम करण्यासाठी आले होते. हे कामगार खर्डा येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होते. दि. 17 मे 2026 रोजी दिवसभर काम करून सर्व कामगार रात्री झोपले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खोलीत प्रवेश करून चार मोबाईल फोन लंपास केले. सकाळी मोबाईल चोरी झाल्याचे लक्षात येताच कामगारांनी खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी तत्काळ तपास पथक घटनास्थळी पाठविले. तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक संशयास्पद चप्पल आढळून आली. पोलीस हवालदार संभाजी शेंडे यांनी ती चप्पल ताब्यात घेत तपासाची दिशा निश्चित केली.

यानंतर पोलीस अंमलदार बाळू खाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी खर्डा गावातील रहिवासी नाना उत्तम काळे याच्यासह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले चारही मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून परिसरातील इतर चोरीच्या घटनांबाबतही माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील तपासात आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही कारवाई खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस अंमलदार बाळू खाडे, शशी म्हस्के, अशोक बडे आणि भगवान पालवे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार संभाजी शेंडे करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  मतदानापासून रोखण्यासाठी संचालकाचे अपहरण ; भाजप नेत्याच्या भावाला पळवून नेले
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ