- जाहिरात -spot_img
breaking news

कोल्हार खुर्दमध्ये भीषण अपघातात महिला ठार, चिमुकली बचावली

कोल्हार
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्दमधील साईध्यान मंदिर परिसरात दि. 19 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान मालवाहू ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर मांडीवर असलेली चिमुकली बचावली आहे, यामुळे नगर-मनमाड राज्यमार्गावर आणखी एक बळी गेल्याने स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होतं आहे.

नगर -मनमाड राज्यमार्ग हा नागरिकांच्या दृष्टीने यमदूत ठरत आहे. गेल्या सहा महिन्यापासून हाती घेतलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होतं असल्यामुळे ठिकठिकाणी रस्ता खोदून खड्डे करण्यात आले आहे.अशातच नरसाळी येथील ज्योती माळी (वय 55) या आपल्या मुलासोबत दुचाकीवर मागे बसून संगमनेरच्या दिशेने चालल्या होत्या, मात्र, कोल्हार खुर्दमधील साईध्यान मंदिर परिसरातून प्रवास करत असताना त्यांच्या पाठीमागून मालवाहू ट्रकचालकाने मद्यधुंद अवस्थेत असताना धडक दिली. दुचाकीवर असलेल्या ज्योती माळी या ट्रकच्या चाकखाली सापडल्याने त्यांना जवळपास 500 फूट या ट्रकखाली फरपटत नेल्याने त्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, मात्र दुचाकी चालवत असलेला त्यांचा मुलगा आणि 4 वषय चिमुकली या बाजूला पडल्याने ते रहस्यमायी रित्या बचावले,

चौकट
पोलीस उशिरा पोहचल्याने नागरिक संतप्त
सकाळी 9 वाजता अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी राहुरी पोलिसांना याबाबत कल्पना देत तत्काळ घटनास्थळी येण्याची विनंती केली. मात्र, एरवी कलेक्शन गोळा करण्यासाठी वेळेपूव गावात भरकटणारे पोलीस तब्ब्ल दीड तास उशिराने अपघातस्थळी पोहचल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येतं होता

हे सुद्धा वाचा :  दुष्काळ आता भूतकाळ होणार; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ