- जाहिरात -spot_img
breaking news

लंडनमधून निघाली साता समुद्रापार पंढरपूरची वारी; 11 देशांचा प्रवास करून 50 दिवसांत पोहोचणार पंढरपूरला

खरवंडी कासार | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात वारीची लगबग सुरू झाली असतानाच भगवानगडांचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या अधिपत्याखाली लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी निघाली आहे. सुमारे 11 देशांचा हजारो किलोमीटर प्रवास करून परदेशी वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत.

6 जून रोजी लंडनच्या रॉयल विंडसर रेस कोर्सवरून या ग्लोबल वारीला भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. तब्बल 50 दिवसाचा प्रवास करून 25 जुलै रोजी (आषाढी एकादशी) पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या वारीचा सुमारे 11 देशांमधून प्रवास होणार आहे.

ही दिंडी केवळ लंडनपूत मर्यादित नसून नेदरलँड, फ्रान्स, जर्मनी पोलंड, हंगेरी, बेल्जियम, रोमानिया, झेक रिपब्लिक व तुर्की अशा विविध देशांमधून या दिंडीचा प्रवास आहे. कपाळी गंध, हातात भगवी पताका, मुखी विठू नामाचा गजर करीत शेकडो परदेशी वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत. या ग्लोबल वारीमुळे सातासमुद्रापारचे अनेक देश वारकरी संप्रदायाशी जोडले जाणार आहेत.

 

हे सुद्धा वाचा :  नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट; अकोळनेर-निंबळक पाचव्या टप्प्याची हायस्पीड चाचणी यशस्वी
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ