१९ ते २१ एप्रिल दरम्यान काका ट्रस्टचे आयोजन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
माजी आमदार स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ प्रसिद्ध कवी आणि रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या ’अपने-अपने राम’ या संगीतमय रामकथेचे आयोजन अहिल्यानगरमध्ये करण्यात आले आहे. काका ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या रामकथेचे आयोजन केले आहे.
रविवार दिनांक १९ ते २१ एप्रिल दरम्यान दररोज सायंकाळी ६ ते ९ यावेळेत नगर शहरातील आनंदधाम रोड वरील राष्ट्रीय पाठशाळेच्या भव्य प्रांगणात ही संगीतमय रामकथा होणार आहे. नगरमधील सर्वात मोठ्या ठरणार्या या रामकथेच्या कार्यक्रमाची तयारी सचिन जगताप व आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास येत आहे. सर्व भाविकांसाठी हा रामकथेचा सोहळा खुला आहे, अशी माहिती काका ट्रस्टचे राजेश भंडारी यांनी दिली.
रामकथा सोहळ्याची अधिक माहिती देताना नगरसेवक विकी जगताप म्हणाले, देशात लोकप्रिय असलेले रामकथाकार डॉ. कुमार विश्वास यांच्या रसाळ वाणीतून श्रीराम कथेची दुर्लभ पर्वणी नगरकरांना प्राप्त होणार आहे. या सोहळ्यासाठी सहकार सभागृहा समोरील राष्ट्रीय पाठशाळेच्या भव्य प्रांगणात जर्मन हँगर पद्धतीचा वॉटर फ्रुफ २०० फुट बाय ५०० फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात हजारो भाविकांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आकर्षक सजावट असलेले व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:0;
brp_del_th:0.0000,0.0000;
brp_del_sen:0.0000,0.0000;
motionR: 0;
delta:null;
bokeh:0;
module: document;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 38;
मंडपात लाईट, स्पीकर व ठिकठिकाणी एलईडी वॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमस्थळी तातडीच्या वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन याचबरोबर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व्यवस्थेसह इतर आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगची सुटसुटीत व्यवस्था जवळच करण्यात आली आहे.गणेश गोंडाळ म्हणाले, स्व.अरुणकाका जगताप यांनी जीवनात कायम अन्न दानाला महत्व दिले होते. त्यांच्या पश्चात हा वारसा पुढे चालवत आहोत. काका ट्रस्टच्या वतीने तीन दिवसीय राम कथेसाठी आलेल्या हजारो भाविकांची दररोज महाप्रसादाची सोय मुख्य मंडपा शेजारीच करण्यात आली आहे.
यासाठी स्वतंत्र मोठ्या मंडपाची व्यवस्था करण्यात आला आहे.शशीकांत घीगे यांनी सांगितले की, कुमार विश्वास हे त्यांच्या देश व भक्तिमय कवितांसाठी लोकप्रिय असून त्यांनी रामकथेच्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे कुमार विश्वास यांची रामकथेचा कार्यक्रम प्रत्यक्ष पाहणे, ऐकणे आणि अनुभवणे हा एक अद्भुत अनुभव नगरच्या भाविकांसाठी ठरणार आहे.माजी आमदार स्व.अरुण जगताप यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त होणार्या या ऐतिहासिक रामकथा सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी व्हावे व तिन्ही दिवस महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन काका ट्रस्टचे अनिल मुरकुटे, अजित जगताप व अनुप काळे यांनी केले आहे.










