- जाहिरात -spot_img
breaking news

भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून संगमनेरकरांची लवकरच सुटका

श्वान निबजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचा शुभारंभ

संगमनेर | नगर सह्याद्री
येत्या काही दिवसांतच भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून संगमनेरकरांची 100 टक्के मुक्तता होईल. उपचारांमुळे, नसबंदेीमुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण तर येईलच; मात्र त्यांना पुन्हा सोडून दिल्यानंतर देखील त्यांच्यातील हिंस्रपणा नाहीसा होईल.प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच यशस्वी ठरेल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

संगमनेर नगरपालिकेच्या वतीने मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या भरीव आर्थिक सहयोगातून मालपाणी फार्मच्या आवारात उभारलेल्या सुसज्ज श्वान निर्बिजीकरण शस्त्रक्रिया व अँटी रेबीज लसीकरण केंद्राचा शुभारंभ आ. तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आरोग्य समितीचे सभापती किशोर टोकसे, मुख्याधिकारी दयानंद गोरे, मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी, जय मालपाणी, मालपाणी फार्मच्या संचालिका रचना मालपाणी आदींसह अनेक नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या केंद्राचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीलाच केक कापून व शुभेच्छापर गीत सादर करण्यात आले. नगरसेविका रचना मालपाणी म्हणाल्या की, या केंद्रामध्ये भटक्या श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया आणि अँटी रेबीज लसीकरण केले जाणार आहे. यासाठी अत्याधुनिक वातानुकूलित ऑपरेशन थिएटर उभारण्यात आले आहे. येथे आणल्या जाणाऱ्या सर्व श्वानांना दिला जाणारा आहार शिजवण्यासाठी किचन बनविण्यात आले आहे. एका पिंजऱ्यामध्ये दहा श्वान राहू शकतील असे सुटसुटीत आणि स्वच्छ पिंजरे तयार करण्यात आलेले आहेत. पाच दिवसात किमान सत्तर श्वानांचे निर्बिजीकरण व अँटी रेबीज लसीकरण करण्याची या केंद्राची क्षमता आहे. या केंद्रामुळे संगमनेरकरांना होणारा भटक्या कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. नगरपालिकेच्या वतीने पुढे हे केंद्र चालविली जाणार असून, आरोग्य समितीचे सभापती किशोर टोकसे यांच्या सूचनेनुसार कर्मचारी तेेथे कार्यरत राहतील, असे सांगितले.

हे सुद्धा वाचा :  केडगावात राडा, बाप-लेकावर हल्ला, मंदिर विश्वस्तावर जीवघेणा हल्ला, भाडेकरूंना धमकावले, कुठे काय घडलं पहा...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ