- जाहिरात -spot_img
breaking news

खुरपणीसाठी शेतकरी शेतात अन्‌‍ चोरट्यांनी साधला डाव

घराचे कुलूप तोडून कपाट फोडले; अडीच लाखांचा ऐवज लंपास

जामखेड | नगर सह्याद्री
तालुक्यातील खर्डा पोलिस ठाणे हद्दीत दिवसाढवळ्या घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे. सोयाबीन खुरपणीसाठी शेतात गेलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाट फोडून त्यामधील 50 हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे.

याबाबत अभिमान अर्जुन बोराडे (वय 35, रा. जवळके, ता. जामखेड) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, 16 जुलै रोजी सकाळी सुमारे 11 वाजता ते व त्यांची पत्नी घराला कुलूप लावून सोयाबीन पिकाच्या खुरपणीसाठी शेतात गेले होते. दुपारी साडेदोनच्या सुमारास त्यांच्या भावजय समृद्धी वर्धमान बोराडे यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली.

चोरीस गेलेल्या ऐवजात 50 हजार रुपयांची रोख रक्कम, सुमारे 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण तसेच प्रत्येकी पाच ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या यांचा समावेश असून, एकूण ऐवजाची किंमत 2 लाख 50 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खर्डा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  जीम ट्रेनरवर पोलिसाने चढवला हल्ला; ट्रेनरकडून इन्शुरन्स अ‍ॅडव्हायजरवर पिस्तूलने हल्ला, काय घडलं पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ