- जाहिरात -spot_img
breaking news

आजचे राशी भविष्य १९ जुलै २०२६

कुंभ : कार्यक्षेत्रात नवीन विचार तुम्हाला नवी ओळख मिळवून देतील. तरीही सहकाऱ्यांपासून सावध राहा. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल.

मेष : जमीन-जुमल्याच्या खरेदीचा विचार करत असाल तर परिस्थिती अनुकूल आहे. नवीन जबाबदारी तुमचा आत्मविश्वास वाढवेल.

वृषभ : खाण्या-पिण्यात निष्काळजीपणा टाळावा. पैशांची कुठे गुंतवणूक करत असाल तर नीट विचार करा. वाहन जपून चालवा.

मिथुन : करिअरमध्ये मोठी झेप घेण्यासाठी हा काळ उत्तम आहे. शनी आणि मंगळाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील.

कर्क : सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरी किंवा व्यवसायात आर्थिक स्थिती मजबूत करणारे नवे मार्ग खुले होतील

सिंह : एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होऊ शकते. मन प्रसन्न राहील. विलासी आणि आरामदायक गोष्टींवर खर्च वाढण्याची शक्यता आहे.

कन्या : आजारी असलेल्या लोकांना जुन्या आजारांपासून आराम मिळेल. पैशांची बचत करण्यासाठी नवीन योजना आखाल. जोडीदारासोबत वाद घालणे टाळा.

तुळ : कार्यक्षेत्रात कामाचा ताण जास्त असेल. पैशांच्या व्यवहाराबाबत चिंता वाढू शकते. संयम आणि शांततेने काम करणे आज तुमच्या हिताचे राहील.

वृश्चिक : उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि जुने रखडलेले पैसे परत येतील. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल.

धनु : वरिष्ठांचे सहकार्य आणि विश्वास तुम्हाला मिळेल. अध्यात्माकडे कल वाढेल आणि नशीब पूर्ण साथ देईल

मकर : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस सावध राहण्याचा आहे.

मीन : आर्थिक स्थिती चांगली राहील आणि मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

हे सुद्धा वाचा :  आजचे राशी भविष्य १९ जून २०२६
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ