- जाहिरात -spot_img
breaking news

दूध उत्पादनाचा संगमनेर पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरणार; महाराष्ट्र -पंजाबमध्ये सामंजस्य करार

संगमनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुयामध्ये मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असून दुधामुळे तालुयात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. या व्यवसायात अधिक संशोधन, कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन याचबरोबर नवनवीन संकल्पना राबवण्यासाठी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यांमधील प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन ५० लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या तालुयातील १५०० युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत हा सामंजस्य करार महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख आणि पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांच्यामध्ये स्वाक्षरी करार झाला. याप्रसंगी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, दूध संघाचे व्हा.चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ.समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे,रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, विक्रमराजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कुर्‍हाडे, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ.प्रमोद पावसे, भारत मुंगसे, प्रतिभा सोमनाथ जोंधळे, मंदा गोरख नवले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी, विनोद हासे यांच्यासह विविध व्हेटर्नरी डॉटर त्याचप्रमाणे तालुयातील युवक, दूध उत्पादक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्त व विचारांवर राजहंस दूधसंघासह संगमनेर तालुयातील विविध सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सहकारी संस्था राज्याला दिशादर्शक ठरल्या आहे. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दररोजसुमारे चार लाख लिटर दूध संकलन होत असून तालुयातून नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत आहे. यामुळे तालुयात मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने याव्यवसायात रणजतसिंह देशमुख यांच्या नेतृत्वात तालुयात एमडीएफ गोठामुरघास या संकल्पना राबवल्या गेल्या.

हे सुद्धा वाचा :  आता प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी स्वतंत्र युनिट

यापुढील काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन यासाठी मिशन ५० लिटर अभियान राबविण्यात येत असून, याअंतर्गत ५० लिटर दूध देणार्‍या गाई निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर पंजाब राज्याने दुग्ध क्षेत्रामध्ये केलेली क्रांती ही दिशादर्शक असून पंजाब आणि महाराष्ट्रात विविध संशोधन, दूधव्यवसायातील कल्पना, माहितीची देवाण – घेवाण, गाईचे आरोग्य व आहार याबाबत अधिक समन्वय राहावा, याकरिता महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून पंजाबबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकर्‍यांना पंजाबमध्ये होणार्‍या नवनवीन प्रयोगांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. याचबरोबर अनेक शेतकर्‍यांना पंजाबमधील शेतकर्‍यांच्या गाई गोठ्यांवर जाऊन तेथील कामाची पाहणी करता येणार आहे. याचबरोबर पंजाबच्या शेतकर्‍यांचे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ