- जाहिरात -spot_img
breaking news

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे येणार…

मुंबई / नगर सह्याद्री –
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता २००० रुपये जमा केले जाणार आहेत. सरकारने पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याची अधिकृत घोषणा केलेली आहे. १३ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा केला जाणार आहेत. त्यामुळे ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २००० रुपये जमा केले जाणार आहे.

केंद्र सरकारने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पीएम किसानचा २२वा हप्ता १३ मार्च रोजी जमा केला जाईल, असं त्याल लिहलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी फेब्रुवारी महिनाभर पीएम किसानच्या हप्त्याची वाट पाहत होते. आता शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार होते.

१३ आणि १४ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर असणार आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते आसामध्ये असणार आहेत. १३ मार्च रोजी ते कोकराझार दौऱ्यावर असणार आहे. यानंतर गुवाहाटी येथे कार्यक्रम होणार आहे. त्यामुळ या कार्यक्रमात पैसे ट्रान्सफर केले जाण्याची शक्यता आहे.

तुम्हाला पैसे येणार की नाही?
पीएम किसान योजनेचा स्टेट्‍स तुम्ही ऑनलाइन पद्धतीने चेक करु शकतात.
सर्वात आधी तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जायचे आहे.
यानंतर Know Your Status वर क्लिक करायचे आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून कॅप्चा कोड टाका.
यानंतर ओटीपी भरुन तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसणार आहे. यावरुन तुम्हाला पैसे येणार की नाही हे कळणार आहे.

हे सुद्धा वाचा :  मराठा समाजासाठी कोणता मास्टर प्लॅन? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पहा
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ