- जाहिरात -spot_img
breaking news

पुण्यात थरकाप! लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात भयानक कृत्य

पुणे / नगर सह्याद्री –
“तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,” असे म्हणत एका माथेफिरूने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. श्रीराम मधु सरुनवर (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हा सगळा प्रकार २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्याच्या एका हॉटेल मध्ये काम करतात. काम संपल्यानंतर बुधवारी पहाटे दोघेही ताडीवाला रोड येथील आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते.

याच वेळी आरोपी सरुनवर दबा धरून बसला होता. पीडित तरुणी ही त्याचा रोष झुगारून मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहते, याचा राग त्याच्या मनात होता. श्रीरामने तिचा रस्ता अडवला आणि “तु माझ्यासोबत का राहत नाहीस? तु माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही,” अशी धमकी दिली.

काही समजण्याच्या आतच, आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रममधील ‘अॅसिड’सारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. हे केमिकल तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर पडल्याने ती जागीच होरपळली. आरोपीने तिच्या मित्रांवर सुद्धा अॅसिड फेकले, ज्यामुळे त्याच्याही पायाला गंभीर दुखापत झाली.

दोघेही वेदनेने ओरडत असताना आरोपी घटनास्थळावरून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. शहराच्या मध्यवस्तीत तरुणीवर अॅसिड हल्ला झाल्याचे समजताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत हुबळी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हे सुद्धा वाचा :  अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ३३४.९८ कोटींच्या मदत, अहिल्यानगरला मिळाला 'इतका' निधी...
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ