नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
पेपरफुटीच्या गंभीर आरोपानंतर नीट २००६ (NEET 2026) रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्त्वाची आहे. पण त्यामध्येच पेपरफुटीचा गंभीर आरोप झाल्याने केंद्र सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नीट परीक्षेचा पेपर लीक
गेल्या काही दिवसांपासून देशभरातून नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याच्या तक्रारी येत होत्या. परीक्षेच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामागील मुख्य सूत्रधार कोण आहे? पेपर लीकचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे? याचा छडा सीबीआय लावणार आहे.
नीट परीक्षा रद्द
नीट २०२६ ची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नीट २०२६ चा पेपर फुटल्याची बातमी समोर आली आहे. आता याप्रकरणी सीबीआय चौकशी होणार आहे. नीटची परीक्षा रद्द करुन ती पुन्हा घेण्यात येणार आहे. पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. मात्र, आता ही परीक्षा कधी घेण्यात येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे,
परीक्षा पुन्हा होणार; सरकारकडून फी माफ
पेपरफुटीच्या संशयानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची असलेली छएएढ-णॠ २०२६ परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सी (छढ) ने घेतला आहे. ३ मे २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेला सुमारे २२ लाख विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत केली जाणार आहे. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली असली, तरी परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत मिळणार आणि फेरपरीक्षेसाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अनेक ठिकाणी पेपर लीक झाल्याचे आरोप करण्यात आले होते. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे. परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत केले जाणार असून, फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. आधी केलेलं रजिस्ट्रेशनच ग्राह्य धरलं जाणार असून, विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशपत्रं दिली जातील. पुढील १५ ते २० दिवसांत नव्या परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शयता आहे. एनटीएने विद्यार्थ्यांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, अधिकृत माहितीसाठी फक्त अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे.










