- जाहिरात -spot_img
breaking news

बच्चू कडूंनी सस्पेन्स संपवला!; काय म्हणाले पहा…

विलीनीकरण झालं तरी हरकत नाही, एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करणार
मुंबई | नगर सह्याद्री-
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना प्रवेश आणि विधानपरिषद उमेदवारी याबाबत अधिकृत घोषणा करणं कडू यांनी टाळलं असलं तरी या प्रवेशाचे स्पष्ट संकेत त्यांनी पत्रकार परिषदेतून दिले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाल्याशिवाय विलीनीकरण शय नाही. मात्र शिवसेना ही आपल्या मातीतील संघटना आहे. भविष्यात प्रहारचं विलीनीकरण झालं तरी हरकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

विधानपरिषद उमेदवारी आणि शिवसेनेतील प्रवेशाबद्दल बोलताना बच्चू कडू म्हणाले की, विधानपरिषद उमेदवारीबद्दल मलाही मीडियातूनच माहिती कळाली आणि कदाचित एकनाथ शिंदे यांनाही तुमच्याकडूनच याबाबत माहिती मिळाली असेल. माझी याबाबत उदय सामंत यांच्यासोबत काही वेळा चर्चा झाली आहे, मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप बैठक झालेली नाही. आता मीडियातून ही चर्चा सुरू झाल्यानंतर आम्ही आमचे शेतकर्‍यांचे, शेतमजुरांचे आणि दिव्यांग बांधवांचे काही प्रश्न एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडू. त्या प्रश्नांवर जर एकनाथ शिंदे सकारात्मक असतील तर विधानपरिषदेचा आम्ही विचार करू. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी भेटायला बोलावलं तर मी त्यांची भेट घेईन, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले की, फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव महत्वाचे आहेत.

शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. पदासाठी युती करणारा बच्चू कडू नाही. १ लाख पेक्षा जास्त सदस्य प्रहार संघटनेचे आहे. शिवसेनाच्या बंडखोरीतून प्रहार संघटना समोर आली. मी एकमेव माणूस आहे की, मी कुणाला पाठिंबा नव्हता, ना कधी पाठिंबा घेतला. विलनिकरणाची चर्चा बघितली, वाईट वाटलं. बातमीतून बातमी तयार झाली आहे. पुढे ते म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला तरी आम्ही थकलो नाही. भाजपसोबत जाण्याचा निर्णय माझा मतदारांना आवडला नाही. गोतावळा होता, त्यात आम्ही हरलो.

हे सुद्धा वाचा :  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन

प्रहारवर अन्याय करण्याची कोणाची हिंमत नाही, कोणाची ताकद नाही. आमची लायकी नाहीये का? १ जागा मिळाली असती. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ. विलनीकरणाबाबत चर्चा तर झाली पाहिजे, मुद्दे काय आहेत ते बघूया. किंतू-परंतू वर कशाला आत्ता बोलायचं. मी चेहर्‍यावरून आनंदी आहे. कारण नाव माझं कडू आहे, चेहरा कडू राहून कसं चालेल. एकनाथ शिंदे यांना शेतकर्‍यांचा मजूराला, दिव्यांगना जर न्याय द्यायचा असेल, त्यांच्यासाठी काम अजून करायचं असेल तर एकनाथ शिंदे यांनी निर्णय घ्यावा, एवढंच मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ