- जाहिरात -spot_img
breaking news

ठाकरे गटाच्या नेत्यावर चाकू हल्ला; संभाजीनगरमध्ये खळबळ

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री –
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर येथील ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात त्यांच्यासोबत असलेले सहकारी मन्नू राठोड हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १० मार्च रोजी मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास कामगार चौक परिसरात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,कृष्णा राठोड यांचे कामगार चौकात ‘जय भवानी’ नावाचे हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून कृष्णा राठोड व त्यांचे सहकारी मन्नू राठोड हे चारचाकी वाहनाने घरी जात होते. कामगार चौकात पोहोचताच समोरून आलेल्या दुचाकीवरून तिघा अज्ञातांनी त्यांचा रस्ता अडवला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली.

या झटापटीदरम्यान अज्ञात आरोपींनी कृष्णा राठोड यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मन्नू राठोड यांच्यावरही आरोपींनी चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या दोघांवर उपचार आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

हे सुद्धा वाचा :  मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; विधानभवनासह चार ठिकाणे लक्ष्य असल्याचा मेल, पोलिसांचा सर्च ऑपरेशन
Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ